पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा विजय संकल्प- रेल्वेमंत्री पीयूष गोयल

Date:

Share post:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा विजय संकल्प- रेल्वेमंत्री पीयूष गोयल। 

BJP’s victory resolution under the leadership of Prime Minister Narendra Modi – Railway Minister Piyush Goyal। 

समाज विकास संवाद!
न्यू दिल्ली,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा विजय संकल्प– रेल्वेमंत्री पीयूष गोयल!

गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांमुळे आगामी लोकसभा निवडणुकीत;

देशाला पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मजबूत सरकार हवे आहे.

भारतीय जनता पार्टीच्या स्पष्ट बहुमताने पुन्हा केंद्रात सरकार स्थापन करण्याचा विजय संकल्प करून भाजपाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत।

असे प्रतिपादन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी मुंबईत केले, ते पत्रकार परिषदेत बोलत होते।

यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशिष शेलार आणि भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी उपस्थित होते.

मा. पीयूष गोयल म्हणाले की, नवी दिल्ली येथे दि. 11 व 12 जानेवारी रोजी भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन झाले.

त्याला देशभरातील बारा हजार नेते – कार्यकर्ते उपस्थित होते.

या अधिवेशनात देशातील राजकीय स्थिती,

मोदी सरकारने केलेले गरीब कल्याणासाठीचे कार्य आणि आगामी निवडणुकीची तयारी याविषयी चर्चा झाली.

अधिवेशनानंतर अत्यंत उत्साही वातावरणात सर्व कार्यकर्ते विजय संकल्प करून आपापल्या प्रदेशात परतले असून,

भाजपाच्या पूर्ण बहुमताने आणि एनडीएच्या दोनतृतियांश बहुमताने पुन्हा एकदा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी कामाला लागले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र-मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा विजय-संकल्प – रेल्वेमंत्री पीयूष-गोयल

 

भाजपाच्या विरोधात विरोधी पक्षांनी महाआघाडीला वैचारिक आधार नाह। 

त्यांनी सांगितले की, भाजपाच्या विरोधात विरोधी पक्षांनी महाआघाडीचा प्रयत्न चालविला

असला तरी,त्या आघाडीला कसलाही वैचारिक आधार नाही.

त्यांना स्वतःच्या महत्वाकांक्षेसाठी मजबूर सरकार हवे आहे.

यापूर्वी देवेगौडा, चरणसिंग, गुजराल, व्ही. पी. सिंग आणि चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखालील

आघाडी सरकारच्या अस्थिरतेमुळे देश त्रस्त झाला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला मजबूत सरकार दिले आहे.

आता देशाला मजबूत सरकार आणि मजबूर सरकार यापैकी एक निवडायचे आहे.

त्यामुळे विरोधकांनी कितीही आघाड्या केल्या तरी एकूण मतांपैकी पन्नास टक्क्यांपेक्षा

जास्त मते मिळवून भाजपा निर्णायक विजय मिळवेल.

ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशाला विकासाच्या नव्या उंचीवर नेले आहे.

गेल्या पाच वर्षात देशाची अर्थव्यवस्था भक्कम झाली असून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा दबदबा वाढला आहे.

देशाची आर्थिक क्षमता वाढल्यामुळे गरीब कल्याणाच्या अनेक योजना यशस्वीरित्या राबविल्या.

प्रत्येकाला वीज, गॅस कनेक्शन, शौचालय, आरोग्य सेवा अशा योजनांचा कोट्यवधींना लाभ झाला आहे.

पंतप्रधान मोदींनी गेल्या पाच वर्षांत भ्रष्टाचारमुक्त सरकार दिले आहे. या सरकारने अभूतपूर्व बदल घडविला आहे.

#समाज_विकास_संवाद,  #समाज_का_विकास, आज_तक_ताजा_खबर, #महाराष्ट्र, मोदी यांच्या नेतृत्वाखालील,

#गोवा, #मुंबई, पंतप्रधान_नरेंद्र_मोदी, भाजपाचा_विजय_संकल्प, रेल्वेमंत्री, पीयूष_गोयल,

New India News, Samaj Ka Vikas, science-technology Samvad,

व्यापार संवाद, आयुर्वेद संवाद, गैजेट्स संवाद, समाज विकास संवाद

Leave a Reply

Related articles

कांदा- सोयाबीन- धान उत्पादकांना केंद्राचा दिलासा! उप मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधानांचे आभार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने बळीराजासाठी आज असंख्य महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.त्यात खास करून कांदा, सोयाबीन, धान आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.या निर्णयाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले आहेत.

उद्धव ठाकरेंचा स्वीय सहायक पैसे घेऊन पद बिक्री करतो! – शिंदेसेना – भाजपचे गंभीर आरोप!

शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्यासह माजी खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते संजय निरुपम आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक (P.A) रवी म्हात्रे यांच्यावर गंभीर आरोप केले.

सहकार भारती, मीरा भाईंदर जिल्ह्याचा वतीने संस्थेच्या स्थापना दिवस साजरा!

सहकार भारती,  मीरा भाईंदर जिल्ह्याचा वतीने सहकार भारती चा स्थापना दिवस साजरा केला गेला .या कार्यक्रमाला सहकार भारती, मीरा भाईंदर च्या विविध प्रकोस्ट चे प्रमुख आणि सहकार भारतीचे कार्यकर्ते उपस्थित होते ...

“सहकार मिलन” – मीरा भायंदरच्या गृहनिर्माण पुनर्विकासात सहकार भारती कडून दिशा प्रदर्शन!

“सहकार मिलन” - मीरा भायंदरच्या गृहनिर्माण पुनर्विकासात सहकार भारती कडून दिशा प्रदर्शन!आंतरराष्ट्रीय सहकार दिनाचे (११ जानेवारी) औचित्य साधून, सहकार भारती, मीरा भाईंदर जिल्हा आणिश्री सिद्धिविनायक नगर वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने " सहकार मिलन " या कार्यक्रमाचे आयोजन८ जानेवारी २०२३ ला श्री सिद्धिविनायक वेल्फेअर असोसिएशनच्या, सभागृहात केले होते.