वैद्यकीय क्षेत्रातील वाढती व्यावसायिकता चिंताजनक – प्रा. अनिरुद्ध देशपांडे!
The growing professionalism in the medical field is worrisome – Pvt. Aniruddha Deshpande.
समाज विकास संवाद!
मुंबई,
वैद्यकीय क्षेत्रातील वाढती व्यावसायिकता चिंताजनक – प्रा. अनिरुद्ध देशपांडे, समाजातील सर्व स्तरांत आरोग्याच्या सेवा पोहोचत नाही, वंचितांसाठी नाना पालकर स्मृती समिती सारख्या संस्था घेत असलेले कष्ट कौतुकास्पद!
आज वैद्यकीय क्षेत्रात व्यावसायिकतेचे वाढते प्रमाण चिंताजनक असून; त्याची मुळे खोलवर रुजलेली आहेत,
असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख प्रा. डॉ. अनिरुद्ध देशपांडे यांनी रविवारी, ७ जुलै रोजी दादर येथे केले.
राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त, नाना पालकर स्मृती समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.
यावेळी मंचावर संस्थेचे अध्यक्ष रवींद्र कर्वे, संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ. हेमा, कार्यवाह अविनाश खरे, डॉ. सुपर्णा निरगुडकर,
डॉ. सुदीप गुप्ता आणि डॉ. अभिजीत सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते.
वैद्यकीय क्षेत्रातील वाढती व्यावसायिकता ! वंचितांसाठी नाना पालकर स्मृती समिती सारख्या संस्था घेत असलेले कष्ट कौतुकास्पद!
डॉ. अनिरुद्ध देशपांडे म्हणाले की, वैद्यकीय शिक्षणक्षेत्रात जेवढी मागणी आहे तेवढ्या जागा नाहीत.
तसेच या क्षेत्राचे बऱ्याच प्रमाणात खासगीकरण झाले आहे. शिक्षणासाठी प्रचंड खर्च होतो.
महाविद्यालयात प्रवेश मिळाला तर रोजगार नाही.वैद्यकीय क्षेत्रातील वाढती व्यावसायिकता चिंताजनक होत चाल्ल्येला ;तफावत वाढते आहे.
आज समाजातील सर्व आर्थिक स्तरांमध्ये वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत.
अशा वंचितांसाठी नाना पालकर स्मृती समितीसारख्या संस्था घेत असलेले कष्ट कौतुकास्पद आहेत.
वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत चांगले संशोधन होत आहे. या संशोधनांमुळे नवनव्या संकल्पना, नव्या उपचार पद्धतींचा आपल्याला लाभ होत आहे.
आरोग्याबाबत समाजात जागृती होत आहे. परंतु, असे असूनही समस्या कमी होत नाहीत.
बालमृत्यू आणि नवमातामृत्यू आजही आपण पूर्णपणे थांबवू शकलो नाही हे अतिशय दुर्दैवी आहे.
सामाजिक विषमतेचा थेट परिणाम आरोग्यविषयक सुविधांवर झालेला दिसून येतो, असेही ते म्हणाले.
वैद्यकीय क्षेत्रातील वाढती व्यावसायिकता ! समाजातील सर्व स्तरांत आरोग्याच्या सेवा पोहोचत नाही!
शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही क्षेत्रांना समाजात अत्यंत प्रतिष्ठा आहे.
पण प्रतिष्ठेसह या क्षेत्रातील व्यक्तींच्या खांद्यावर समाजाने जबाबदारीही सोपविलेली आहे व ती त्या व्यक्तीने पूर्ण करणे अपेक्षित आहे.
समाजातील सर्व स्तरांत आरोग्याच्या सेवा पोहोचत नाहीत हे समाजाचे विदारक वास्तव आहे.
त्या सेवा एकाच वेळी सर्व समाजात पोहोचल्या पाहिजेत यासाठी कष्ट घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
संपूर्ण समाजाचे आरोग्य चांगले व्हायला हवे असेल तर तीन गोष्टींची आवश्यकता!
डॉ. देशपांडे म्हणाले की, संपूर्ण समाजाचे आरोग्य चांगले व्हायला हवे असेल तर तीन गोष्टींची आवश्यकता आहे.
एक, रक्ताच्या पिशव्यांची किंमत कमी व्हावी. दोन, लोकसहभागातून डायलेसिस मोफत व्हावे आणि तीन, स्टेंटच्या किमती आणखी कमी व्हाव्यात.
समाजाच्या आरोग्याच्या मुख्य समस्यांचे निराकरण झाले तर, लोकांना जीवन प्रदान करणे सोपे होईल.
आयुषमान भारतसारख्या कौतुकास्पद योजनांसाठी समाजातील सर्व डॉक्टरांनी एकत्र येणे आवश्यक आहे.
तसेच बंद झालेले आर.एम.पी. सारखे वैद्यकीय अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्याची आवश्यकताही त्यांनी बोलून दाखविली.
नाना पालकर स्मृती समितीच्या वतीने या कार्यक्रमात अक्टरेक टाटा मेमोरियल रुग्णालयाचे उपसंचालक डॉ. सुदीप गुप्ता,
नागालँडसारख्या राज्यातील दुर्गम भागात जाऊन वैद्यकीय शिबिरे घेणाऱ्या डॉ. सुपर्णा निरगुडकर आणि सोहम ट्रस्टचे अध्यक्ष,
भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर म्हणून परिचित असणारे डॉ. अभिजीत सोनावणे यांचा राष्ट्रीय डॉक्टर दिवसाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला.
…
#Home, #New India, #स्वास्थ्य, #आयुर्वेद, #योगशास्त्र,
समाज, समाज विकास, समाज संवाद, विकास, विकास संवाद, संवाद,
samaj, samaj vikas, samaj samvad, vikas, vikas samvad, samvad,
Amazing Amazon News, Samaj Vikas Samvad, New India News, Samaj Ka Vikas,
Amazon Prime News, व्यापार संवाद, आयुर्वेद संवाद, गैजेट्स संवाद, समाज विकास संवाद