धर्म माणसांना जोडतो, तोडत नाही – सरसंघचालक श्री मोहन भागवत!
Religion connects people, it does not break them – Sarsanghchalak Shri Mohan Bhagwat!
समाज विकास संवाद,
मुंबई,
धर्म माणसांना जोडतो, तोडत नाही – सरसंघचालक श्री मोहन भागवत, संन्यास आश्रमाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते, भारतात मनुष्याचा निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा कृतज्ञतेचा!
समाज मधे धर्म माणसांना जोडण्याचे कार्य करतो, तोडत नाही.
धर्म हा अर्थ आणि काम या पुरुषार्थांची पूर्तता करताना शिस्तीच्या मार्गाने मनुष्याला मोक्षाकडे घेऊन जातो.
सृष्टीला परमात्म्याशी जोडणारा धर्मच आहे. कालानुरूप त्याचे नवे रूप आज पहायला मिळते आहे. जगातील सर्व दुःख दूर व्हावे,
सर्वत्र प्रकाश पसरावा याकरिता धर्माचरण केले पाहिजे, असे सांगणारी आदि शंकराचार्यांची वैदिक परंपरा आहे.
केवळ भारतातच ही परंपरा सांगणारे अनेक महान गुरू सर्व संप्रदायांमध्ये आढळून येतात,
असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केले.
संन्यास आश्रमाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते!
विलेपार्ले येथील संन्यास आश्रमाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आश्रमाचे व्यवस्थापक महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरी होते.
यावेळी स्वामी हृदयानंद गिरी, महामंडलेश्वर स्वामी प्रणवानंद सरस्वती आणि महामंडलेश्वर गुरुशरणानंद यांचे
प्रवचन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास आमदार पराग अळवणी, ज्येष्ठ पत्रकार ब्रजमोहन पांडे,
राघवेंद्र द्विवेदी, माजी उपमहापौर अरूण देव आदी मान्यवर उपस्थित होते.
पूर्वजांनी केलेल्या चुकांचा आज आदरपूर्वक निषेध नोंदविला पाहिजे!
सरसंघचालक म्हणाले की, स्वा. सावरकर म्हणाले होते, आपल्या पूर्वजांनी केलेल्या चुकांचा आज आदरपूर्वक निषेध नोंदविला पाहिजे.
कालानुरूप धर्मात, परंपरांमध्ये चुकीच्या गोष्टींचा अंतर्भाव झाला होता. दांभिकता वाढली होती.
आदि शंकराचाऱ्यांनी त्यांचे खंडन करून धर्म पुन्हा शुद्ध रुपात विकसित केला.
भारतात मनुष्याचा निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा कृतज्ञतेचा!
आपण निसर्गाचाच एक भाग आहोत हे विसरलो असल्यानेच आज जगभरात पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या.
पूर्वी मात्र भारतात मनुष्याचा निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा कृतज्ञतेचा होता. त्यामुळेच
आपण सुमारे एक हजार वर्ष संपूर्ण जगाला अन्नधान्य पुरविले. या काळात कोणाचे शोषण झाले नाही.
अर्थव्यवस्था जगभरात प्रथम क्रमांकावर होती, असेही सरसंघचालक म्हणाले.
…
#समाज_विकास_संवाद, आज तक ताजा खबर, आज की ताजा खबर, आज का समाचार, आज के समाचार,
Amazing Amazon News, Samaj Vikas Samvad, New India News, Samaj Ka Vikas,
समाज, समाज विकास, समाज संवाद, विकास, विकास संवाद, संवाद,
samaj, samaj vikas, samaj samvad, vikas, vikas samvad, samvad,
व्यापार संवाद, आयुर्वेद संवाद, गैजेट्स संवाद, समाज विकास संवाद.