जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हातडी येथे VSTF निधीतून सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशिन बसवणे संपन्न!
Installation of Sanitary Pad Disposal Machine from VSTF Fund at Hindi on the occasion of International Women’s Day!
समाज विकास संवाद!
मुंबई,
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हातडी येथे VSTF निधीतून सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशिन बसवणे संपन्न!
हातडी येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने VSTF निधीतून सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशिन बसवणे व
मुलींच्या व महिलांच्या मासिक पाळीविषयी जनजागृती कार्यक्रम डॉ.सौ सुप्रिया मंत्री व डॉ स्वप्नील मंत्री यांच्या
उपस्थितीत संपन्न, जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत
ग्रामपंचायत हातडी येथे,विविध उपक्रम राबविण्यात आले।
गावातील महिलांना मासिक पाळी विषयी जनजागृती करण्यासाठी तसेच सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीन चे महत्त्व
ते कसे वापरावे याविषयी परतूर मंत्री हॉस्पिटलचे डॉ स्वप्नील बी मंत्री व डॉ.सौ सुप्रिया मंत्री यांनी गावातील
किशोरवयीन मुलींना व महिलांना मार्गदर्शन केले, सुरवातीला डॉ स्वप्नील मंत्री यांनी सध्या गंभीर असलेला विषय म्हणजे
करोना व्हायरस या विषयी माहिती देऊन यापासून बचाव करण्यासाठी कोणती काळजी घेणं अपेक्षित आहे
यावर मार्गदर्शन केले तसेच मुलीं व महिलांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजना व उपक्रम –
सुकन्या समृद्धी योजना, बेटी बचाओ – बेटी पढाओ, प्रधान मंत्री मातृत्व वंदन योजना,
मुद्रा योजना याविषयी माहिती दिली।
त्यानंतर गावातील महिला सौ मिनाक्षी बोरकर ,डॉ मंत्री व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते
सॅनिटरी डिस्पोजल मशिनची पूजा करण्यात आली।
ग्रामपरिवर्तक गौरव वने यांनी मशीनमध्ये पॅड कशा पद्धतीने टाकायचे याविषयी माहिती दिली।
तसेच गावात सॅनिटरी पॅड आशा सेविका,स्वयं सहायता बचत गट यांच्याकडे स्वस्त दरामध्ये उपलब्ध आहेत याविषयीची माहिती दिली।
यावेळी डॉ.सौ सुप्रिया मंत्री यांनी खालील माहिती सांगितली।
– मुलींच्या मनातील मासिक पाळी संदर्भात त्यांच्याशी मनमोकळेपनाने हितगुज करत त्यांना असलेल्या विविध शंकांचे निरसन केले.
– कापड वापरण्याची जुनी पद्धत बंद करून सॅनिटरी पॅड वापरणे आरोग्याच्या दृष्टीने किती महत्वाचे आहे हे
मुलींना चांगल्या प्रकारे समजून सांगितले.
– मासिक पाळी दरम्यानच्या काळात कोणती काळजी घ्यावी याविषयी सविस्तर माहिती दिली व मुलींच्या मनातील
इतर आरोग्य विषयक शंकांचे सोप्या भाषेत निरसन केले.
– महिलांनी व मुलींनी VSTF च्या माध्यमातून घेतलेल्या या *सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीन चा उपयोग* करण्याचे आवाहन केले।
जागतिक महिला दिन! महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जालना उपजिविका अंतर्गत “आपलं दुकान” आपलं विकास!
तसेच सकाळी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान *जालना उपजिविका* अंतर्गत *आपलं दुकान* विकास
महिला उमेद ग्रामसंघ मार्फत गावातील सौ इंदुमती झरेकर यांच्या दुकानाच।
श्री रमेशराव आढाव(अध्यक्ष-तालुका दक्षता समिती), श्री मधुकर झरेकर (ग्रा प सदस्य) यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलं।
यासोबतच,अंगणवाडी मध्ये सावत्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पोषण पंधरवडा उदघाटन करण्यात आले।
उपस्थित असलेल्या गावकऱ्यांनी ग्रामपरिवर्तक यांच्या बरोबर *पोषण शपथ* घेतली।
त्यानंतर बालकांना हात कसे धुवावेत याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले।
यावेळी डॉ.स्वप्नील मंत्री, डॉ सौ सुप्रिया मंत्री,श्री रमेशराव आढाव(तालुका दक्षता समिती अध्यक्ष),
श्री मधुकर झरेकर(ग्रा प सदस्य), श्री शिवाजी बोरकर(अध्यक्ष-शालेय व्यवस्थापन समिती),
सौ इंदुमती झरेकर(पोलीस पाटील), सौ रेणूका गोरे, स्वयं सहायता गटातील महिला ,श्रीमती सत्यशीला खेत्रे,
सौ अनिता राऊत,सौ संगिता शिंगणे,किशोरवयीन मुली व महिला, अंगणवाडीतील बालके,
गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपरिवर्तक गौरव वने यांनी केले।
…
#समाज_विकास_संवाद, #समाज_का_विकास, सुकन्या समृद्धी योजना, बेटी बचाओ – बेटी पढाओ,
प्रधान मंत्री मातृत्व वंदन योजना, मुद्रा योजना, जागतिक महिला दिन,
Samaj Vikas Samvad, New India News, Samaj Ka Vikas,
व्यापार संवाद, आयुर्वेद संवाद, गैजेट्स संवाद, समाज विकास संवाद!