कोरोना लसीकरण जनप्रबोधन! कोरोना लस का घ्यावी़?

Date:

Share post:

कोरोना लसीकरण जनप्रबोधन!   कोरोना लस का घ्यावी़ ?

 

 

 

 

डॉ. स्वप्नील बी. मंत्री (बालरोग तज्ञ,)
समाज विकास संवाद!
मुंबई,

कोरोना लसीकरण जनप्रबोधन! कोरोना लस का घ्यावी़ ? ह्दयरोग, मूत्रपिंडाचा रोग, प्रत्यारोपण, संधिवात स्टिराॅइड घेणार्या लोकांनी लस घ्यावी का, लस घेतल्यावर पण मास्क लावावे लागणार का, कोव्हीड लसीकरणाबद्दल येऊ शकणारा अनुभव। 

 

 1) कोरोना लस का आणि कसे घ्यावी़ ?
कोरोनामुळे १०० लोकांमध्ये २ ते ४ मृत्यु होत आहेत. लसिकरणामुळे दुष्परिणाम झाला तरी तो लाखात १ इतके कमी प्रमाणात आहे
आणि तो सुध्दा प्राणघातक असेल असे नाही. म्हणून आजार उद्भवण्यापेक्षा लसिकरण करणे जरूरी आहे.
 2) लसिकरणाची कार्यक्षमता आहे का?
सर्व मंजूर लसींमध्ये कोविडमुळे मृत्युपासून बचाव करण्यासाठी १०० टक्के कार्यक्षमता आहे.
गंभीर कोविडच्या विरूध्द अत्यंत उच्च कार्यक्षमता व रोगप्रतिकारक क्षमता आहे.
 3) कोरोना लस सुरक्षित आहे का?
सर्व लसी पुर्णपणे सुरक्षित आहेत.
 4) आम्हाला कोणती लस मिळणार? पर्याय आहे का?
आता तरी सगळीकडे कोविशिल्ड – सिरम, पुण्याची लस उपलब्ध आहे. काही सेंटरमध्ये कोवाक्सिन आहे पण
दोन्ही लसी अतिशय सुरक्षित आहेत त्यामुळे नामको लसिकरण सेंटरला जे उपलब्ध आहे ते घ्या.
5) दुसर्या टप्प्यात कोण-कोण लस घेवू शकते?
६० वर्षावरील प्रत्येक व्यक्ती आणि ४५ वर्षावरील गंभीर आजार असलेल्या व्यक्ती जसे कॅन्सर,
किडनीचे आजार इ. यांना आपल्या जवळच्या सेंटरमध्ये लस घेता येईल.
त्यासाठी कोविन ॲप वर नोंदणी करावी अथवा नामको लसिकरण केंद्रामध्ये येवून नोंदणी करावी.

कोरोना लसीकरण जनप्रबोधन! लस का घ्यावी़?

 

 

 

 

6) लस घेतल्यानंतर काय दुष्परिणाम होवू शकतात?
ताप, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ, उलटी, अशक्तपणा हे सर्व सामान्य दुष्परिणाम साधरणपणे दिसतात.
ते १ ते २ दिवस राहतात. साध्या पॅरासिटामोल/क्रोसीन या औषधाने बरे वाटते. काहींना तर काहीच लक्षण दिसत नाहीत.
वरीलपैकी काहीही त्रास झाल्यास घाबरण्याचे कारण नाही. हे शरीराची प्रतिकार शक्ती कार्यान्वीत झाल्याचे लक्षण आहे.
7) लस घ्यायला जाण्यापूर्वी काय तयारी करावी?
लस घ्यायला शक्यतो भरल्यापोटी जावे. उपाशीपोटी जावू नये.
लसिकरण सेेंटरवर कमी जास्त वेळ लागु शकतो त्यामुळे पाण्याची बाटली, कोरडा खाऊ, बिस्कीटे, कोकम सरबत किंवा लिंबू सरबत घेवून जावे.
तसेच जातांना सोबत आपले आधारकार्ड व पॅनकार्ड घेवून जावे.
 8) लस किती वेळा घ्यावे?
पहिला डोस घेतला की साधारणपणे २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा.
 9) कॅन्सर व इतर आजाराच्या रूग्णांनी लस घ्यावी का?
नक्कीच, फक्त आधी आपल्या कॅन्सर तज्ञांचा सल्ला घ्यावा व कोविडचे लसिकरण करून घ्यावे.

कोरोना लस का घ्यावी़ ? ह्दयरोग, मूत्रपिंडाचा रोग, प्रत्यारोपण संधिवात स्टिराॅइड घेणार्या लोकांनी लस घ्यावी का?

 

 

 

 

 

10) ह्दयरोग, मूत्रपिंडाचा रोग, प्रत्यारोपण, संधिवात स्टिराॅइड घेणार्या लोकांनी लस घ्यावी का?
१०० टक्के!  मुळात लस याच लोकांसाठी बनली आहे ज्यांना असे आजार – Co-morbidity आहेत.
फक्त लस घेण्यासाठी योग्य तो कालावधी कोणता हे कळावे म्हणून वरील रूग्णांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्याने लसिकरण करावे.
 11) ॲलर्जीक ब्रोन्कायटीस (दमा) असलेल्या लोकांनी लस घ्यावी का?
नक्कीच घेऊ शकता परंतु ॲलर्जी खूप तीव्र असेल तर त्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
 12) कोविड होवून गेल्यावर पण लस घ्यावी का?
हो १०० टक्के कारण कोविड नंतर बनणा-या प्रतिकार क्षमता कालांतराने नष्ट होतात.
लसीने मिळणारी प्रतिकार क्षमता जास्त कालावधी पर्यंत राहतात.
 13) नुकताच कोविड झाला असेल तर लस कधी घ्यावी?
कोविड होवून गेल्यावर ८ ते १२ आठवडयांनी लस घ्यावी.
 14) मी सर्व नियम पाळतो मला वर्षभरात कोरोना झाला नाही, माझी प्रतिकारशक्ती चांगली आहे तरी मी लस घ्यावी का?
१०० टक्के! हो। 
 15) लहान मुलांना लस दयावी का?
१६ वर्षाखालील मुलांना देवू नये.
 16) गर्भवती महिलांना लस दयावी का?
सध्या त्याचा डेटा उपलब्ध नाही त्यामुळे सध्या तरी देवू नये। 

लस घेतल्यावर पण मास्क लावावे लागणार का ?

 

 

 

 

17) कोरोना लस घेतल्यावर पण मास्क लावावे लागणार का?
हो. लसिकरण नंतरही हलगर्जिपणा करून चालणार नाही. मास्क, सॅनिटायझर हे वापरणे गरजेचे आहे.
18) कोरोनाची लस नंतर १०० टक्के कोरोना होणार नाही का?
असे अजिबात नाही पण झाला तरी तो सौम्य असेल.
 19) जर लस घेवूनही कोरोना होणार असेल तर लसिचा हेतू काय?
  • कोविडची दुसरी लाट टाळणे.
  • मृत्यू दर कमी करणे.
  • गंभीर रूग्णांचे प्रमाण कमी करणेे.

 

 

 20) लस घेतल्यावर रोग प्रतिकारक शक्ती कधी तयार होणार?
पहिल्या डोस घेतल्यानंतर ४५ दिवसानंतर रोग प्रतिकारक शक्ती तयार होते पण त्यासाठी २८ दिवसानंतर दुसरा डोस घेणे गरजेचे आहे.
४५ ते ५९ वयोगटातले व्याधीग्रस्त व ६० वर्षावरील सर्वांनी हे लसीकरण करून स्वतःला व आपल्या परीवाराला कोरोना संक्रमणापासुन सुरक्षीत ठेवा.

कोव्हीड लसीकरणाबद्दल येऊ शकणारा अनुभव :-

 

 

 

 

 

 

१) जर समजा तुम्ही दुपारी २ वाजता लस घेतली तर त्या दिवशी तुम्हाला शक्यतो काहीच त्रास होणार नाही, पण रात्री झोपल्यानंतर रात्री थोडीशी थंडी आल्यासारखी वाटेल।
२) अंगात ताप असल्यासारखे वाटेल परंतु जर तुम्ही thermometer ने ताप चेक केला तर तो बहुधा नॉर्मल म्हणजे १००℃ पेक्षा कमीच भरेल। 
३) अंगात किंचित, कमी अधिक प्रमाणात कणकण जाणवू शकते। 
४) बरेच डॉक्टर, सिस्टर, आणि मेडिकोज, तुम्हाला अशा वेळेस डॉक्टर यांनी निम्नलिखित दवाई घेण्याची परामर्श देऊ शकतो! 
  • T. Crocin500mg/Fepanil500mg/Paracetamol 500mg/Dolo 650mg अशा प्रकारच्या टॅब्लेटस अथवा, T.Zerodol-P दवा ची पण सल्ला काही डाकटोर यांनी देतात। 

 

 

  • जर तुम्हाला जास्त डिस्कम्फर्ट Discomfort वाटत असेल तर अशा वेळेस तुम्ही ती टॅबलेट घेऊ शकता.

 

 

  • अथवा, दवाई न घेता सहन करू शकता, याला immunogenic response Of Our Own Body असे संबोधल्या जाते.

 

 

 

  • तो आला म्हणजे Body is preparing that immunogenic response, It’s natural. तो नैसर्गिक आणि नॉर्मल असतो, त्याला घाबरायची गरज नसते.

 

 

 

कोव्हीड लसीकरणाबद्दल येऊ शकणारा अनुभव!

शरीरातील पाण्याची पातळी चांगली गाठणे आवश्यक आहे। 

 

 

 

 

 

 

 

 

५) तुमच्यापैकी काही जणांना हातपाय दुखणे, अशक्तपणा, डोके जड पडणे, डोकेदुखी, जुलाब, क्वचित उलट्या असे पण लक्षणे दिसून येऊ शकतात, त्यावेळेस पण जनरल मॅनेजमेंट करायची, जी की आपण नेहमी करतो.
सर्वात महत्वाचे म्हणजे, तुम्हाला लसीकरणाच्या अगोदर ,नंतर, तुमचे Hydration ( तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी चांगली गाठणे आवश्यक आहे.) मेंटेन ठेवणे अतिआवश्यक आहे.
त्यामुळे भरपूर पाणी,लिक्विड डायट,लिंबू शरबत, ताक, मोसंबी ज्यूस, सफरचंद ज्यूस आदींचा वापर करावा.
जेणे करून तुमचा येणारा ताप, ताप-तत्सम कणकण केवळ तुमच्या पाणी पिण्याने आणि इतर गोष्टींने निघून जाईल.
 ६) दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी तुम्हाला अशक्तपणा, कमजोरी, हातपाय दुखणे, पूर्ण बॉडी-पेन , अंगदुखी असे किरकोळ त्रास होऊ शकतात.पण जर तुम्ही व्यवस्थित गोष्टी फॉलो केल्या तर तो त्रास कमी होईल.एकदा का २४ तास झाले की त्रास हा शून्य होतो म्हणजे संपतो.
७) दुसरा डोस हा २८ दिवसानंतर घ्यावा, व तो लक्षात ठेवावा, लिहून ठेवावा.
८) काही जणांना इंजेक्शन च्या जागी किरकोळ सूज, लालसरपणा, हाताला जडपणा, हात हलवताना त्रास, दुखणे आदी त्रास उद्भवू शकतात. तो त्रास पण हळूहळू कमी होणारा असतो. परंतु तुम्हाला कुठल्याही क्षणी जर वाटले की हा त्रास थोडा नॉर्मल पेक्षा वेगळा आहे, त्यावेळेस तुम्ही लगेचच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व उपचार करावेत.

कोव्हीड लसीकरणाबद्दल येऊ शकणारा अनुभव!

कोविद ची लसीकरण केल्यानंतर अर्धा तासात सहसा असले त्रास होतात. 

 

 

 

 

 

 

 

 

९) लसीकरण केल्यानंतर अर्धा तासात सहसा असले त्रास होतात, ते त्रास तिथे थांबून रुल आऊट म्हणजे जिथल्या तिथे देखरेखीखाली थांबून सोडवावेत. त्यामुळे लसीकरण केल्यानंतर आम्ही तुम्हाला अर्धा तास देखरेखीखाली तिथेच Observation Room मध्ये थांबायला सांगतो.

 

 

कोरोना लसीकरण हे पूर्णपणे सुरक्षित आहे, व विश्वास ठेवून घ्यावे.

 

 

 

 

 

१०) लसीकरण हे पूर्णपणे सुरक्षित आहे, व विश्वास ठेवून घ्यावे.
११) मनातील भीती पूर्णपणे काढून टाकावी, जेणे करून मानसिक दृष्ट्या तुम्ही फिट असाल तर बाकीच्या गोष्टी ह्या सुकर होतील.

कोरोना लसीकरण जनप्रबोधन! लस का घ्यावी़?

कोरोना लसीकरन झाले नंतर रोग प्रतिकारक शक्ती कधी तयार होणार?

लस नंतर १०० टक्के कोरोना होणार नाही का?

लहान मुलांना लस दयावी का?

कोरोनाची लस किती वेळा घ्यावे?

लस सुरक्षित आहे का? कोव्हीड लसीकरणाबद्दल येऊ शकणारा अनुभव। 

लस घ्यायला जाण्यापूर्वी काय तयारी करावी?

दुसर्या टप्प्यात कोण-कोण लस घेवू शकते?

कॅन्सर व इतर आजाराच्या रूग्णांनी लस घ्यावी का?

ह्दयरोग, मूत्रपिंडाचा रोग, प्रत्यारोपण संधिवात स्टिराॅइड घेणार्या लोकांनी लस घ्यावी का?

Samaj Vikas, Samaj, Samaj Vikas, Samaj Vikas Samvad, Samaj Ka Vikas,

व्यापार संवाद, आयुर्वेद संवाद, गैजेट्स संवाद, समाज विकास संवाद,

समाज, समाज विकास, समाज संवाद, विकास, विकास संवाद, संवाद,

samaj, samaj vikas, samaj samvad, vikas, vikas samvad, samvad,

4 COMMENTS

  1. कोरोना ची लस घेतल्या तर साइड इफैक्ट काय काय होवु शकतो , कृपया मार्गदर्शन करा

Leave a Reply

Related articles

कांदा- सोयाबीन- धान उत्पादकांना केंद्राचा दिलासा! उप मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधानांचे आभार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने बळीराजासाठी आज असंख्य महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.त्यात खास करून कांदा, सोयाबीन, धान आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.या निर्णयाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले आहेत.

उद्धव ठाकरेंचा स्वीय सहायक पैसे घेऊन पद बिक्री करतो! – शिंदेसेना – भाजपचे गंभीर आरोप!

शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्यासह माजी खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते संजय निरुपम आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक (P.A) रवी म्हात्रे यांच्यावर गंभीर आरोप केले.

क्या सच में बीयर नॉनवेज होती है? क्या आपके ड्रिंक में शामिल होती है मछली

क्या सच में बीयर नॉनवेज होती है? क्या आपके ड्रिंक में शामिल होती है मछली?

सहकार भारती, मीरा भाईंदर जिल्ह्याचा वतीने संस्थेच्या स्थापना दिवस साजरा!

सहकार भारती,  मीरा भाईंदर जिल्ह्याचा वतीने सहकार भारती चा स्थापना दिवस साजरा केला गेला .या कार्यक्रमाला सहकार भारती, मीरा भाईंदर च्या विविध प्रकोस्ट चे प्रमुख आणि सहकार भारतीचे कार्यकर्ते उपस्थित होते ...