ओबीसीं राजकीय आरक्षण ची दिशाभूल ठरवून! न्यायालयाने दिलेली त्रिसूत्री

Date:

Share post:

ओबीसीं राजकीय आरक्षण ची दिशाभूल ठरवून! न्यायालयाने दिलेली त्रिसूत्री!

 

 

 

– प्रसाद काथे 
(सुप्रसिद्ध राजनैतिक विश्लेषक)
समाज विकास संवाद!
मुंबई,

 

ओबीसी राजकीय आरक्षण , ओबीसी आरक्षण ची दिशाभूल, त्रिसूत्री काय आहे, न्यायालयाने दिलेली त्रिसूत्री काय आहे?

-समाज विकास संवाद

ओबीसी राजकीय आरक्षण नुकसानीची कारणे थेट मविआ शी निगडित आहेत।

तरीही, मविआ कडून जनगणनेची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टाकून वडेट्टीवार खुशाल होऊ पाहतायत.

याच्या जोडीला, मविआ समर्थक व्यक्तिगत स्वार्थापोटी गप्प बसले आहेत।

अनेक #मविआचे_पाळीव निकालपत्र न वाचता बरळतायत।

ज्याला मविआकडून स्वार्थपूर्ती हवीय तो स्वतःच्या समाजाची होणारी दिशाभूल पाहून न पाहिल्यासारखे करतोय।

यास्थितीत #ओबीसी समाजाची दिशाभूल कशी होतेय ते सांगणे गरजेचे आहे।

निकालपत्र म्हणते,

राजकीय आरक्षण रद्द झाले कारण, राज्याने त्रिसूत्री पाळली नाही’ ।

 

राज्य सरकारची जबाबदारी या नात्याने न्यायालयाने दिलेली त्रिसूत्री काय आहे?

 

  • १) राज्यात ओबीसींच्या मागासलेपणाची ‘सूक्ष्मतम नोंद’ करण्यासाठी ‘समर्पित आयोगाची निर्मिती’ करणे।

 

  • २) समर्पित आयोगाच्या सल्ल्यानुसारच स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदारसंघनिहाय आरक्षणाची ‘तुल्यबळ टक्केवारी’ आखून देणे।

 

  • ३) कोणत्याही स्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थेत कुठल्याही पातळीवर ५०% ‘मर्यादा न ओलांडणारे आरक्षण’ लागू करणे।

 

 

 

ओबीसी राजकीय आरक्षण ! – ओबीसी समाजाने ही त्रिसूत्री नीट लक्षात घ्यावी।

 

ओबीसीं ची दिशाभूल ठरवून! न्यायालयाने दिलेली त्रिसूत्री काय आहे?

सर्व ओबीसी समाजाने ही त्रिसूत्री नीट लक्षात घ्यावी. कारण यात अनेक उपमुद्दे लपलेले आहेत।

 

  • उपमुद्दा १) राज्यांतर्गत ओबीसींच्या मागासलेपणाची सूक्ष्मतम नोंद करणे।

सध्या चर्चेत असलेल्या ‘एमपीरिकेल डेटा’ या शब्दासाठी पर्यायी मराठी शब्द सूक्ष्मतम नोंद।

ही नोंद राज्य सरकारलाच करायची आहे। कारण, स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण ही राज्याची जबाबदारी आहे।

यासाठी, महाराष्ट्र सरकारलाच राज्यातले ओबीसी मोजावे लागतील।

त्या आधारेच, स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रचना लावावी लागेल। ही राज्याचीच जबाबदारी आहे, केंद्राची नाही।

 

  • उदा:- नाशिक मनपा निवडणुकीत एखादा ओबीसी नेता अमुक एका वॉर्डमध्ये तिकिटासाठी प्रयत्न करतोय।

कारण, त्या वॉर्डमध्ये आत्ता ओबीसी आरक्षण आहे।

मात्र, ते आरक्षण आगामी निवडणुकीत राहील का हे मविआला आज ठरवायचे आहे।

त्यासाठी, त्यांना त्या वॉर्डमधील जनगणना करावी लागेल। ज्यात समाजनिहाय आकडेवारी समोर येईल,

हे मविआला ग्रामपंचायतीपासून मनपा स्तरापर्यंत सर्व ठिकाणी करायचे आहे,

ते करायची राजकीय इच्छाशक्ती मविआची नाही।

जोडीला वेळ कमी उरला असल्याने ओबीसींची जनगणना केंद्राने करावी अशी मागणी वडेट्टीवार करत आहेत।

राजकीय आरक्षण ओबीसींनी तत्काळ महाराष्ट्रातच गमावले असताना आणि

स्वतःवर ओबीसी आरक्षण टिकवण्याची जबाबदारी असताना मविआचे ओबीसी नेते केंद्राकडे बोट दाखवतायत।

 

 

 

ओबीसीं ची दिशाभूल, त्रिसूत्री काय आहे – ओबीसी समाजाची आणखी एकदा उघड दिशाभूल वडेट्टीवार करतायत, कशी ते पाहा!

 

ओबीसीं ची दिशाभूल ठरवून! न्यायालयाने दिलेली त्रिसूत्री काय आहे?

  • उपमुद्दा २) सूक्ष्मतम नोंद करण्यासाठी समर्पित आयोगाची निर्मिती!

इथे ओबीसी समाजाची आणखी एकदा उघड दिशाभूल वडेट्टीवार करतायत. कशी ते पाहा,

मविआ सांगतेय की, न्या. निर्गुडे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मागासवर्ग आयोगाची झालेली निर्मिती ही

ओबीसी समाजाच्या मागासलेपणाची नोंद करण्याचे काम करेल, हे होणे नाही! कारण,

 

  • – न्यायालयाने समर्पित आयोगाची निर्मिती करायचे आदेश दिले आहेत।

 

  • – राज्य मागासवर्ग आयोग स्थायी आहे।

 

  • – राज्य मागासवर्ग आयोग हा केवळ ओबीसींच्या मागासलेपणाची सूक्ष्मतम नोंद करण्यासाठीच निर्माण झालेला नाही।

 

  • – न्या. गायकवाड यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ३ मार्च २१ला न्या. निर्गुडे यांची नियुक्ती झालीय।

 

  • – सर्वोच्च न्यायालयाने समर्पित आयोगाची निर्मिती करण्याचा आदेश ४ मार्च २१ला दिला आहे।

 

  • – वडेट्टीवार यांनी ३ जून २१ रोजी राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य घोषित केले।

 

  • – राज्यात ओबीसींच्या मागासलेपणाची सूक्ष्मतम नोंद करण्यासाठीच समर्पित आयोग न्यायालयाच्या आदेशानंतरही आजवर निर्माण झालेला नाही। 

 

त्यातच, आता ४ मार्च २१चा आदेश ३ मार्च २१च्या नियुक्तीला लागू करण्याची कायदेशीर घोडचूक

वडेट्टीवार यांच्याकडून करवली जातेय! कारण,

मविआ मध्ये ज्यांना ओबीसी आरक्षण लागू होऊ द्यायचे नाही त्यांना एक बळीचा बकरा हवाय आणि;

मंत्रीपद टिकवायच्या नादात वडेट्टीवार समाजाचे नुकसान करत आहेत।

 

 

 

ओबीसी आरक्षण! राज्याने त्रिसूत्री पाळली नाही तर? संभाव्य धोके!

 

  • उपमुद्दा ३) स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदारसंघनिहाय ओबीसी आरक्षणाची तुल्यबळ टक्केवारी आखून देणे।

न्यायालय जेव्हा तुल्यबळ म्हणते तेव्हा हे अपेक्षित असते की, राज्य सरकारने मतदारसंघनिहाय जातगणना करावी।

तशी गणना झाली की, एका मतदारसंघात ओबीसी किती आणि इतर किती ते चटकन समजेल आणि

त्या आधारे आरक्षण रचना लागू होईल।

 

राज्याने त्रिसूत्री पाळली नाही तर?

 

संभाव्य धोके!

  • -राज्यात समर्पित आयोगाची निर्मिती न करता ओबीसी आरक्षण लागू राहिले तर ते न्यायालयात नियमबाह्य ठरेल।

 

  • -जनगणना वेळेत न झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार नाहीत।

 

  • -विना निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासकाच्या पर्यायाने राज्य सरकारच्या ताब्यात जातील।

 

  • -येत्या मनपा निवडणुकीपूर्वी ओबीसी जनगणना झाली नाही तर निवडणुकीत ओबीसी समाजाचे थेट नुकसान होईल।

 

 

 

ओबीसी राजकीय आरक्षण ! सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या आदेशामुळे ओबीसी नक्की किती हे सांगायची सुवर्णसंधी! तरी ही!

 

ओबीसीं ची दिशाभूल ठरवून! न्यायालयाने दिलेली त्रिसूत्री काय आहे?

  • कारण,

न्यायालय आपल्या निकालात असे ही म्हणतेय की,

त्रिसूत्रीचे पालन न झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक कार्यक्रमात ओबीसींना प्रतिनिधित्व देता येणार नाही।

ओबीसी समाजाबाबत इतकं महत्त्वपूर्ण घडूनही,

सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या आदेशामुळे ओबीसी नक्की किती हे सांगायची सुवर्णसंधी

नेत्यांना मिळत असतानाही मंत्रीमंडळातले ओबीसी नेते गप्प आहेत।

कारण,

  • १) अजित पवारांनी डोळे वटारल्यावर बोलायची यांची हिंमत नाही।

 

  • २) स्वतःच्या समाजापेक्षा मंत्रीपद महत्त्वाचे आहे।

 

  • ३) ओबीसी जनगणना झाली तर या ओबीसी नेत्यांच्या राजकारणाचे हत्यार निष्प्रभ होईल।

 

ओबीसी समाजाने एक लक्षात घ्यावे!

#मविआचे_पाळीव निकालपत्र न वाचता मंत्री जे बोलतायत तुम्हाला त्याचेच ढोल वाजवतायत।

ते त्यांना करू द्या, तुम्ही डोळे उघडले तर तरच तुमचे नुकसान कळेल।

ओबीसीं ची दिशाभूल त्रिसूत्री काय आहे,

समाज, समाज विकास, समाज संवाद, विकास, विकास संवाद, संवाद,

samaj, samaj vikas, samaj samvad, vikas, vikas samvad, samvad,

#New_India, news live, news India, newspaper, news today, #Canva

6 COMMENTS

Leave a Reply

Related articles

कांदा- सोयाबीन- धान उत्पादकांना केंद्राचा दिलासा! उप मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधानांचे आभार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने बळीराजासाठी आज असंख्य महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.त्यात खास करून कांदा, सोयाबीन, धान आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.या निर्णयाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले आहेत.

उद्धव ठाकरेंचा स्वीय सहायक पैसे घेऊन पद बिक्री करतो! – शिंदेसेना – भाजपचे गंभीर आरोप!

शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्यासह माजी खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते संजय निरुपम आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक (P.A) रवी म्हात्रे यांच्यावर गंभीर आरोप केले.

क्या सच में बीयर नॉनवेज होती है? क्या आपके ड्रिंक में शामिल होती है मछली

क्या सच में बीयर नॉनवेज होती है? क्या आपके ड्रिंक में शामिल होती है मछली?

Hindenburg Report May Discipline Adani Group & Prosper It Further.

Hindenburg report may discipline Adani Group and prosper It further.In 2006, A renowned economic affairs expert and a very potent journalist Mr. Swaminathan S. A. Ayer researched and wrote a paper for the Cato Institute on Gujarat's new strategy of port-based development .This strategy was launched by Congress chief minister Chimanbhai Patel in the early 1990s and expanded by BJP's successors.