उद्योजक होण्याची स्वप्ने बाळगणाऱ्यांसाठी ‘चाणक्य’ ॲप प्रेरणादायी : स्वामी विज्ञानानंद।
Chanakya app inspiring for those who dream of becoming an entrepreneur: Swami Vigyanananand
समाज विकास संवाद!
मुंबई,
उद्योजक होण्याची स्वप्ने बाळगणाऱ्यांसाठी ‘चाणक्य’ ॲप प्रेरणादायी : स्वामी विज्ञानानंद, वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम, सर्व हिंदूंनी एकत्र येऊन व्यापार करावा आणि जास्तीत जास्त अर्थार्जन करुन समृद्ध व्हावे!
उद्योगपती, व्यापारी, विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि गुंतवणूकदारांचा समूह यांच्याशी ‘द वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम’द्वारे समन्वय साधला जातो.
या प्रतिष्ठितांचे ज्ञान व त्यांचे अनुभव उद्योजक होण्याची स्वप्ने बाळगणाऱ्यांना प्रेरणादायी व मार्गर्शक ठरतील,
असे प्रतिपादन ‘वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम’चे संस्थापक आणि विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महासचिव स्वामी विज्ञानानंद यांनी आज येथे केले.
उद्योजक होण्याची स्वप्ने बाळगणाऱ्यांसाठी ‘चाणक्य’ ॲप अत्यंत प्रेरणादायी सिद्ध होणार.
‘द वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम’च्यावतीने तयार करण्यात आलेल्या ‘चाणक्य’ ॲपचे पत्रकार संघात अनावरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्रीराज नायर देखील उपस्थित होते.
सर्व हिंदूंनी एकत्र येऊन व्यापार करावा आणि जास्तीत जास्त अर्थार्जन करुन समृद्ध व्हावे!
सर्व हिंदूंनी एकत्र येऊन व्यापार करावा आणि जास्तीत जास्त अर्थार्जन करुन समृद्ध व्हावे,
याकरिता ‘द वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम’ जगभरातील निरनिराळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांना एकत्र आणून एका विश्वसनीय मंचासारखे काम करते.
व्यापार करण्याची प्रबळ इच्छाशक्ती, तंत्रज्ञान, आर्थिक पाठबळ तसेच बाजारात घडत असलेल्या विद्यमान घडामोडी यांची योग्य सांगड फोरमद्वारे आयोजित बैठकांमधून घातली जाते.
या सगळ्याचा तपशील ‘चाणक्य’ ॲपच्या माध्यमातून मिळण्यास मदत होईल.
या ॲपमध्ये जगभरातील एकूण एक लाख ८० हजार सदस्यांचा तपशील असून फोरमच्या सदस्यांना एकमेकांना एकत्रित आणण्यासाठी,
माहिती, ज्ञान मिळण्यासाठी मदत मिळू शकते.
प्रबळ भारत करायचा असेल तर आपली आर्थिक बाजूही सक्षम झाली पाहिजे!
खरेदी, विक्री बाबतची चौकशी वा अन्य तत्सम माहिती याॲपवर सभासदांना टाकता येईल.
तसेच नोकरी मिळविण्यासाठी किंवा नोकरी देण्यासाठी त्याबाबतचा अर्ज सभासद या ॲपवर देऊ शकतात.
प्रबळ भारत करायचा असेल तर आपली आर्थिक बाजूही सक्षम झाली पाहिजे,
याकरिता जास्तीत जास्त लोकांनी या ॲपचा उपयोग करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
…
चाणक्य ॲप प्रेरणादायी – स्वामी विज्ञानानंद, #समाज_का_विकास, आज तक ताजा खबर,
Amazing Amazon News, Samaj Vikas Samvad, New India News, Samaj Ka Vikas,
Gadget Samvad, science-technology Samvad, Global Samvad,
समाज, समाज विकास, समाज संवाद, विकास, विकास संवाद, संवाद,
samaj, samaj vikas, samaj samvad, vikas, vikas samvad, samvad,
Amazon Prime News, व्यापार संवाद, आयुर्वेद संवाद, गैजेट्स संवाद, समाज विकास संवाद
[…] west-Bengal, Tripura-Vikas-samvad, […]