डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने केला दोनवेळा पराभव !
Congress defeated Dr Babasaheb Ambedkar twice!
योगेश वसंत त्रिवेदी,
समाज विकास संवाद!
मुंबई,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने केला दोनवेळा पराभव, बाबासाहेबांचा पराभव करणारे उमेदवार काँग्रेसचे होते, बाबासाहेब आंबेडकर यांनी तर काँग्रेस पक्ष म्हणजे जळकं घर असल्याचे सांगितले होते.
भारताला १५ ऑगस्ट१९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. मुस्लिमांसाठी पाकिस्तान आणि हिंदुंसाठी हिंदुस्थान अशी भारताची फाळणी झाली.
त्यानंतर घटनासमितीने घटनेचा मसुदा तयार करुन तो राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना घटनासमितीचे प्रमुख
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सुपूर्द केला.
आणि २६ जानेवारी १९५० रोजी आपला भारत प्रजासत्ताक झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून अवघ्या विश्वासमोर ओळखले जातात.
परंतु याच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेस पक्षाने १९५२ सालच्या लोकसभेच्या
पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत मुंबईत आणि १९५४ च्या भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव केला होता.
पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पहिल्या मंत्रीमंडळात कायदेमंत्री असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा
दोन वेळा काँग्रेस पक्षाने पराभव केल्यानंतर त्यांना खरे पाहता बाबासाहेबांचे नां घेण्याचा नैतिक अधिकार नाही.
आमचे मित्र डॉ. पुरुषोत्तम उर्फ राजू पाटोदकर हे सध्या लोकसभेच्या निवडणुकीत मुंबई शहर जिल्हाधिकारी आणि
मुंबई जिल्ह्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्या अधिपत्याखाली प्रसार माध्यम कक्षाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
आंबेडकर यांचा काँग्रेसने केला दोनवेळा पराभव ! निवडणूक पूर्वपीठिका प्रकाशित केली!
त्यांनी एक निवडणूक पूर्वपीठिका प्रकाशित केली आहे.
यामध्ये१९५२ सालापासूनची महत्वपूर्ण माहिती उपलब्ध करुन दिली आहे.
त्यातील पान क्रमांक ३९ अनुसार १९५२ साली लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मुंबई उत्तर मतदारसंघात एकूण आठ उमेदवार उभे होते.
त्यापैकी काँग्रेसचे विठ्ठल बाळकृष्ण गांधी यांना १ लाख ४९ हजार १३८,
समाजवादी पक्षाचे अशोक रणजितराम मेहता यांना १ लाख ३९ हजार ७४१,
काँग्रेसच्या नारायण सदोबा काजरोळकर यांना १ लाख ३८ हजार १३७
आणि शेड्यूल कास्ट फेडरेशनचे भीमराव रामजी आंबेडकर यांना १ लाख २३ हजार ५७६ मते मिळाली.
बाबासाहेबांचा पराभव करणारे उमेदवार काँग्रेसचे होते!
या मतदारसंघात भाई श्रीपाद अम्रुत डांगे, गोपाळराव विनायक देशमुख, केशव बाळकृष्ण जोशी,
निलकंठ बाबुराव परुळेकर हेही निवडणुकीच्या रिंगणात होते. भाई डांगे यांनाही ९६ हजार ७५५ मते मिळाली होती.
१९५२ च्या या निवडणुकीत सर्वसाधारण आणि राखीव या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते.
१९५४ साली भंडारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली तेंव्हा
मुंबईत पराभूत झालेले अशोक मेहता हे समाजवादी पक्षाचे आणि
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शेड्युल कास्ट फेडरेशन तर्फे उभे राहिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अशोक मेहता यांच्या प्रचारासाठी जयप्रकाश नारायण,
एस. एम. जोशी आणि नानासाहेब गोरे हे प्रजा समाजवादी पक्षाचे नेते आले होते.
या निवडणुकीत बाबासाहेब आंबेडकर यांचा ८ हजार ३३१ मतांनी पराभव झाला परंतु अशोक.मेहता निवडून आले.
बाबासाहेबांचा पराभव करणारे उमेदवार काँग्रेसचे होते.
पण काँग्रेस चा एक उमेदवार मेहतांनी पराभूत केला होता.
राजकीय विश्लेषक सुहास सोनावणे यांनी ही माहिती एका लेखात दिली असून
त्यांनी प्रकाश आंबेडकर यांचे आरोप खोडून काढीत अलौकिक नीतिमत्तेमुळेच बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव झाल्याचे नमूद केले आहे.
बाबासाहेब आंबेडकर यांनी तर काँग्रेस पक्ष म्हणजे जळकं घर असल्याचे सांगितले होते.
yogeshtrivedi55@ gmail.com
…
#समाज_विकास_संवाद, #समाज_का_विकास, डॉ_बाबासाहेब_आंबेडकर, काँग्रेस,
Amazing Amazon News, Samaj Vikas Samvad, New India News, Samaj Ka Vikas,
Gadget Samvad, science-technology Samvad, Global Samvad,
समाज, समाज विकास, समाज संवाद, विकास, विकास संवाद, संवाद,
samaj, samaj vikas, samaj samvad, vikas, vikas samvad, samvad,
Amazon Prime News, व्यापार संवाद, आयुर्वेद संवाद, गैजेट्स संवाद, समाज विकास संवाद