स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अवमान करु नका हो!
Stop insulting freedom fighter Vinayak Damodar Savarkar!
योगेश वसंत त्रिवेदी
समाज विकास संवाद!
मैं राहुल गांधी हूं – राहुल सावरकर नहीं, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अवमान करु नका हो – योगेश वसंत त्रिवेदी, सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी प्रस्ताव, सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन मार्ग काढावा!
‘की घेतले न हे व्रत अंधतेने । लब्धप्रकाश इतिहास निसर्ग माने । जे दिव्य, दाहक म्हणूनी असावयाचे ।
बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे।।’ या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या मार्गदर्शक काव्यपंक्ती अंदमान येथील
सेल्युलर जेल मधून तत्कालीन पेट्रोलियम मंत्री मणिशंकर अय्यर यांनी निष्ठूरपणे काढून टाकल्या आणि
संपूर्ण भारतात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मानणाऱ्या तमाम देशभक्तांचा संताप झाला.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे!
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते दादर येथील शिवतीर्थावर मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला
‘जोडे मारो’ हा जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सावरकर यांच्याबद्दलचे प्रेम, त्यांच्या बद्दलची भावना आणि
राष्ट्रभक्ती ओतप्रोत भरलेले समस्त देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने शिवतीर्थावर हजर झाले होते.
विद्याधर चिंदरकर यांनी सामना चा प्रतिनिधी म्हणून माझ्या वर या कार्यक्रमाचे वृत्तांकन करण्याची जबाबदारी सोपविली होती.
मला एक वेगळा अनुभव मिळणार होता. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित मराठी आणि हिंदी या भाषांमध्ये
ख्यातनाम संगीतकार सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांनी पूर्ण लांबी चे चित्रपट तयार केले होते. या चित्रपटाची रिळे
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक दादर येथून प्लाझा चित्रपटगृहात मिरवणुकीने नेण्याचा कार्यक्रम यापूर्वी झाला होता.
त्याही वेळी माझ्याकडे त्या कार्यक्रमाच्या बातमी आणि मुलाखतीची जबाबदारी होती. त्याचवेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे
चिरंजीव विश्वासराव सावरकर यांची मुलाखत ‘सामना’ साठी घेतल्याने विश्वासराव यांचा चांगला परिचय झाला होता.
त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते मणिशंकर अय्यरच्या पुतळ्याला जोडे मारण्याचा कार्यक्रम झाला तेंव्हा योगायोगाने
विश्वासराव शिवाजी पार्क च्या जवळून जात असतांना माझी नजर अचानक त्यांच्याकडे गेली. मी धावतच गेलो आणि
विश्वासरावांना घेऊन आलो. मालाडचे पदाधिकारी अशोक पटेल यांना सांगून विश्वासराव सावरकर यांना व्यासपीठावर
बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळ पाठविले. या कार्यक्रमाला एक वेगळी शान प्राप्त झाली. बाळासाहेब ठाकरे यांनी
विश्वासराव सावरकर यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला विश्वासराव भारावले.
एका हिंदुहृदयसम्राट सुपूत्राचा दुसऱ्या हिंदुहृदयसम्राटांच्या हस्ते सत्कार झाला.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अवमान! “मैं राहुल गांधी हूं – राहुल सावरकर नहीं।”
या सर्व गोष्टींची आठवण यासाठी की झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे अल्पकालीन अध्यक्ष
राहुल गांधी यांनी, ” मैं राहुल गांधी हूं – राहुल सावरकर नहीं ।”
अशी मुक्ताफळे उधळली आणि देशात पुन्हा एकदा सावरकर हा विषय पेटला. मुळात राहुल गांधी यांच्याकडून सावरकर यांच्या
संदर्भात काही चांगले वक्तव्य ऐकण्याची भारतातील एकशेतीस कोटी नागरिकांनी अपेक्षा बाळगणे हीच चूक आहे.
सावरकर यांची संपूर्ण कारकीर्द, त्यांचा जीवनसंघर्ष, त्यांचा स्वातंत्र्य लढा या सर्वच गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी राहुल गांधी यांना
एक जन्म पुरणार नाही. किमान पक्षी स्वतःच्या आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या
संदर्भात जे गौरवोद्गार काढले होते त्याची तरी माहिती जाणून घेतली तरी ते वाट्टेल ते बरळणार नाहीत. अटलबिहारी वाजपेयी हे
भारताचे पंतप्रधान असतांना डॉ. मनोहर जोशी हे लोकसभेचे अध्यक्ष होते.
चित्रकर्ती चंद्रकला कुमार कदम यांनी तयार केलेले भव्य तैलचित्र संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात लावण्यात आले!
त्यावेळी चित्रकर्ती चंद्रकला कुमार कदम यांनी तयार केलेले
भव्य तैलचित्र संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात लावण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या एका
छोटेखानी पुस्तिकेच्या रंगीत पानावर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल गौरवोद्गार
काढलेले पत्र प्रसिद्ध करण्यात आले होते. राहुल गांधी हे खासदार असल्याने त्यांना ही पुस्तिका सहज पाहता येऊ शकेल.
अर्थात तशी इच्छाशक्ती असायला हवी. राहुल गांधी यांना कदाचित स्मृती भ्रंशाचा रोग जडला आहे की काय अशी शंका येते
कारण सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर या महोदयांनी माफी मागितली असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत.
मग ती माफी मागणारे राहुल गांधीच होते नां ? नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काढलेल्या उद्गारांमुळे जर सर्वोच्च न्यायालयाने
आदेश दिल्यामुळे राहुल गांधी यांना माफी मागावी लागली असेल तर मग स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा घोर अपमान केल्याबद्दल
कोणती शिक्षा द्यावी ? एका अर्थाने राहुल गांधी म्हणतात ते बरोबरच आहे, ते सावरकर नाहीत ते. कारण एकूणच त्यांचा लौकिक,
त्यांची पार्श्वभूमी पाहता ते सावरकर असूच शकत नाहीत आणि हे नियतीने केलेले या भारतवर्षावरचे सर्वात मोठे उपकार म्हणावे लागतील.
लोकशाहीत आचार स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य जरी असले तरी त्याचा स्वैराचार करु नका! -योगेश वसंत त्रिवेदी
या निमित्ताने स्वतःला डाव्या विचारसरणीचा म्हणवून घेणाऱ्या प्रत्येकाने आपली सावरकर विरोधाची खाज भागवून घेतली
असल्याचे दिसून आले. तुम्हाला सावरकर यांच्या बद्दल प्रेम, जिव्हाळा, सन्मान, गौरव आदी चांगल्या गोष्टी बोलायच्या नसतील
तर बोलू नका पण त्यांची टिंगलटवाळी, अवहेलना, कुचेष्टा, विटंबना तरी करु नका. लोकशाहीत आचार स्वातंत्र्य,
विचार स्वातंत्र्य जरी असले तरी त्याचा स्वैराचार करु नका. त्यांनी देशासाठी केलेल्या कामाची नोंद घेऊन कृतज्ञता बाळगण्याचा
दिलदारपणा दाखवा. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संस्थगित झाले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी प्रस्ताव संमत करुन घ्यावा!
आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ‘भारतरत्न’
देण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करणारा प्रस्ताव संमत करुन घ्यावा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व
प्रवीण दरेकर यांना सोबत घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ नेऊन त्यांच्या कडे एकमुखी मागणी करावी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या २६ जानेवारी २०२० रोजी
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न किताब जाहीर करुन तमाम देशवासियांच्या भावनांची पूर्तता करावी, ही अपेक्षा.
जम्मु काश्मीर बद्दलचे ३७० कलम, अयोध्येत प्रभू रामाचे भव्य मंदिर हे दोन्ही मुद्दे मार्गी लागले आहेत.
सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी प्रस्ताव ! सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन मार्ग काढावा!
आता देशातील सध्याचे अशांततेचे वातावरण शांत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी
पुढाकार घ्यावा.सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन मार्ग काढावा. त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना
‘भारतरत्न’ घोषित करुन एकशेतीस कोटि भारतीयांचा स्वाभिमान शतगुणित करावा. सावरकर यांच्या मुद्द्यावर
समाज माध्यमातून जशी विरोधी वक्तव्य पहायला मिळाली तशीच काही जुनी थोरामोठ्यांची भाषणेही ऐकायला मिळाली.
अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे,शरद पवार यांच्या जुन्या भाषणांमधून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची
थोरवी वर्णन करणाऱ्या व्हिडिओ क्लिप्स ऐकायला मिळाल्या. या सर्वांचे संकलन अर्थातच दादर येथील
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या कार्यालयात उपलब्ध असेल.
तथाकथित टीकाकारांनी या बाबींचा सुद्धा परामर्श घ्यावा, माहिती जाणून घेण्यासाठी प्रयत्न करावा. न जाणो,
त्यांचे मत-मन परिवर्तन होईल. हे ईश्वरा, ही सद्बुद्धी अशा समस्त टीकाकारांना आणि निरीश्वरवादी महानुभावांना देवो,
या देशात सर्वांना गुण्यागोविंदाने राहण्याची प्रार्थना करण्याची ‘हीच वेळ आहे !’ जीवनविद्या मिशन चे प्रणेते सद्गुरु वामनराव पै
यांनी विश्व प्रार्थनेत म्हटल्याप्रमाणे,’हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे ; आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव;
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे !’
…
योगेश वसंत त्रिवेदी,
(yogeshtrivedi55@ gmail.com, 9892935321)
…
#समाज_विकास_संवाद, #समाज_का_विकास, आज तक ताजा खबर, आज की ताजा खबर,
Amazing Amazon News, Samaj Vikas Samvad, New India News, Samaj Ka Vikas,
समाज, समाज विकास, समाज संवाद, विकास, विकास संवाद, संवाद,
samaj, samaj vikas, samaj samvad, vikas, vikas samvad, samvad,
व्यापार संवाद, आयुर्वेद संवाद, गैजेट्स संवाद, समाज विकास संवाद
[…] स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या संदर्भातील आपली जुनी भाषणे लोकं विसरलेली नाहीत! […]