परतूर निवासी तर्फे रेलवे स्थानकात झालेल्या ‘राज्यराणी एक्सप्रेस‘ चे स्वागत !
Partur resident welcomes ‘Rajyarani Express’ at railway station!
समाज विकास संवाद!
मुंबई,
परतूर निवासी तर्फे रेलवे स्थानकात झालेल्या ‘राज्यराणी एक्सप्रेस’ चे स्वागत !
हुजूरसाहिब नांदेड ते छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई या मार्गावर १० जानेवारीपासून सुरू झालेल्या राज्यराणी एक्स्प्रेसचे
शुक्रवारी पहिल्याच दिवशी परतूरकरांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले।
परतूर निवासी तर्फे रेलवे स्थानकात! राज्यराणी एक्स्प्रेस आता हुजूरसाहिब नांदेडपर्यंत धावणार आहे!
दक्षिण-मध्य-रेल्वे ने मराठवाड्यातील प्रवाशांची मुंबईला जाण्या-येण्याची सोय व्हावी यासाठी पुर्वी मुंबई-मनमाड
या दोन स्थानका दरम्यान धावणाऱ्या राज्यराणी एक्स्प्रेसच्या मार्गात आणि वेळापत्रकात मोठा बदल केला असून
नव्या बदलानुसार ही गाडी आता हुजूरसाहिब नांदेडपर्यंत धावणार आहे.या गाडीला परतूर येथे थांबा देण्यात येतो किंवा नाही
याबाबत तर्क-वितर्क लावण्यात येत होते.मात्र सदरील गाडीला परतूरला थांबा देण्यासाठी सर्व नागरिकांच्या वतीने
डॉ स्वप्निल बी मंत्री यांनी पाठपुरावा केला होता.
हुजूर साहिब नांदेड स्थानकातून रात्री १०:०० वाजता सुटणारी ही गाडी रात्री १२:१५ वाजता परतूर स्थानकात पोहोचणार आहे.
तर परतीच्या प्रवासात ही गाडी मुंबई येथून सायंकाळी ६:४५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ७:२० वाजता नांदेडला पोहोचणार आहे.
उत्साहात झाले राज्यराणी एक्स्प्रेस चे स्वागत !
ही गाडी शुक्रवारी रात्री परतूर स्थानकात आली असता या गाडीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
बालरोग तज्ञ डॉ.स्वप्निल मंत्री,पत्रकार राजकुमार भारूका,अर्जुन पाडेवार,रेल्वे स्थानक सुपरवायजर सनी,
मनीष अग्रवाल,सुमीत मोर,गणेश अग्रवाल यांनी गाडीचे स्वागत केले.गाडीच्या चालकाचा देखील यावेळी
सत्कार करण्यात आला.स्टेशनमास्टर बी.पी.तांबे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
…
आज तक ताजा खबर, आज की ताजा खबर, आज का समाचार, आज के समाचार,
Amazing Amazon News, Samaj Vikas Samvad, New India News, Samaj Ka Vikas,
Gadget Samvad, science-technology Samvad, Global Samvad,
व्यापार संवाद, आयुर्वेद संवाद, गैजेट्स संवाद, समाज विकास संवाद