ऐतिहासिक निर्णय-मेट्रो लाईन 10,11आणि12 ला मंजूरी, हॉलटेक करणार 4846 कोटी ची गुंतवणूक!
Historic decision-Metro lines 10, 11, and 12 approved, Heiltech to invest Rs 4846 crore!
समाज विकास संवाद!
मुंबई ,
ऐतिहासिक निर्णय-मेट्रो लाईन 10,11आणि12 ला मंजूरी, हॉलटेक करणार 4846 कोटी ची गुंतवणूक!
प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत आज;
मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधीकरणाची (एमएमआरडीए) 146 वी बैठक मुंबई येथे झाली.
मंत्री श्री प्रकाश मेहता, श्री रणजित पाटील आणि मुंबई तसेच एमएमआर क्षेत्रातील
महापालिकांचे महापौर यावेळी उपस्थित होते.
या बैठकीत मुंबईसाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले.
मेट्रो लाईन 10, 11 आणि 12 साठीच्या सविस्तर प्रकल्प अहवालांना मंजुरी प्रदान करण्यात आली,
एमएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात अनेक नव्या ठिकाणांचा समावेश करण्यात आला;
मेट्रो परिचालन महामंडळाची स्थापना करण्यास मंजुरी
आणि मेट्रो परिचालन महामंडळाची स्थापना करण्यास मंजुरी प्रदान करण्यात आली.
हे मेट्रो प्रकल्प पुढीलप्रमाणे आहेत.
गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड)- मेट्रो 10 :
एकूण लांबी : 11.2 कि.मी
प्रकल्प किंमत : 4476 कोटी रूपये
स्थानके: 4 उन्नत
वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -मेट्रो 11 :
एकूण लांबी : 11.4 किमी
प्रकल्प किंमत : 8739 कोटी रूपये
स्थानके: 10 (2 उन्नत, 10 भुयारी)
कल्याण-डोंबिवली-तळोजा (विस्तारित मेट्रो 5) -मेट्रो 12 :
लांबी : 20.75 कि.मी
किंमत: 4132 कोटी रूपये
स्थानके: 17
आता या सर्व प्रकल्पांचे अहवाल हे राज्य सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी जातील.
ऐतिहासिक निर्णय-मेट्रो लाईन 10,11आणि12 ला मंजूरी, हॉलटेक करणार 4846 कोटी ची गुंतवणूक!
विरार-अलिबाग बहुद्देशीय ट्रान्सपोर्ट कॉरिडॉरसाठी प्रकल्प
विरार-अलिबाग बहुद्देशीय ट्रान्सपोर्ट कॉरिडॉरसाठी प्रकल्प अंमलबजावणी युनिटसाठी सुद्धा तत्वत:
मंजुरी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदान केली. याची एकूण लांबी 97 कि.मी असून,
यात 41 पूल, 51 उड्डाणपूल, 39 अंडरपास, 4 पादचारी मार्ग आणि 9 आंतरजोडणींचा समावेश आहे.
या प्रकल्पाची किंमत 39,841 कोटी रूपये आहे.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना कँपसच्या विकासासाठी एमएमआरडीएला विकास प्राधीकरण म्हणून मान्यता प्रदान करण्यात आली आहे. याशिवाय,
एमएमआरडीएच्या क्षेत्रात आता पालघर जिल्ह्यातील पालघर तालुका आणि वसईचा काही भाग,
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल आणि खालापूर तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे.
मेट्रोच्या देखभालीसाठी आणि कार्यान्वयनासाठी मुंबई मेट्रो ऑपरेशन कार्पोरेशन लि.ची स्थापना करण्यास सुद्धा मंजुरी प्रदान करण्यात आली.
एमएमआरडीएच्या लोगोचे यावेळी विमोचन करण्यात आले.
मेट्रो ग्रीन पॉलिसीचे सुद्धा विमोचन करण्यात आले.
या धोरणामुळे अगदी नियोजनाच्या पातळीवर उर्जाबचत शक्य होणार आहे.
यातून मेट्रोची स्थानके सुद्धा पर्यावरणपूरक असतील. हेरिटेज सर्किट मॅप्सचे सुद्धा यावेळी विमोचन करण्यात आले.
ऐतिहासिक निर्णय-मेट्रो लाईन 10,11आणि12 ला मंजूरी, हॉलटेक करणार 4846 कोटी ची गुंतवणूक!
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र शासन आणि हॉलटेक एशिया प्रा.लि. यांच्यात उर्जा क्षेत्रासाठी लागणार्या उपकरण आणि;
तंत्रज्ञानाच्या निर्मितीसाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
एमएमआरडीए येथे हा सामंजस्य करार करण्यात आला,
त्यावेळी मंत्री श्री सुभाष देसाई उपस्थित होते.
हॉलटेक 680 दशलक्ष डॉलर्सची (4846 कोटी रूपये) गुंतवणूक करणार असून,
राज्य सरकार या प्रकल्पाला मदत करणार आहे.
पेट्रोकेमिकल, एरोस्पेस आणि तत्सम उद्योगांसाठी हा प्रकल्प उपयुक्त असणार आहे.
प्रामुख्याने उर्जा आणि प्रक्रिया उद्योगाचा यात अंतर्भाव आहे.
हॉलटेक इंटरनॅशनल 5 देशांमध्ये सध्या कार्यरत असून,
त्यांचे उपकरण आणि तंत्रज्ञान हे अमेरिकेतील 80 टक्के अणुउर्जा क्षेत्रात वापरले जात आहेत.
सुमारे 35 देशातील 200 प्रकल्पात त्यांनी उर्जाप्रकल्प उपकरण दिले आहेत.
…
#महाराष्ट्र, #गोवा, #मुंबई, ऐतिहासिक_निर्णय, मेट्रो_लाईन, हॉलटेक, गुंतवणूक,
Samaj Vikas Samvad, New India News, Samaj Ka Vikas,
Gadget Samvad, science-technology Samvad, Global Samvad,
Samaj, Samaj vikas, Samaj Samvad, vikas, Vikas Samvad, Samvad,
समाज, समाज विकास, समाज संवाद, विकास, विकास संवाद, संवाद,
व्यापार संवाद, आयुर्वेद संवाद, गैजेट्स संवाद, समाज विकास संवाद
[…] ऐतिहासिक सातशे वर्ष जुन्या नागेश्वर महादेव मंदिराचे जीर्णोद्धार! […]
[…] विकास फेलोशिप कार्यक्रम-महाराष्ट्र सरकार का उपक्रम […]