महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपा नंबर वन असेल – प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे!

Date:

Share post:

महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपा नंबर वन असेल – प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे!

समाज विकास संवाद!
मुंबई ,

महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपा नंबर वन असेल – प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे!

राज्यात नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक नगराध्यक्षपदे व सर्वाधिक

नगरसेवकपदे जिंकून भारतीय जनता पार्टी पहिल्या क्रमांकावर राहिली. त्याचप्रमाणे

महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपा नंबर वन असेल – प्रदेशाध्यक्ष

खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी रविवारी मुंबईत व्यक्त केला.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारांना मा. प्रदेशाध्यक्षांनी शपथ दिली

व प्रचाराचा शुभारंभ केला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान करणाऱ्या

१०५ हुतात्म्यांच्या स्मारकाला वंदन करून प्रचाराचा शुभारंभाचा कार्यक्रम झाला.

मुंबई भाजपा आमदार अध्यक्ष आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात

मा. प्रदेशाध्यक्ष बोलत होते.

मुंबई महापालिकेत भाजपाला पराभूत करण्यासाठी शिवसेना व काँग्रेस पक्षाने छुपी युती

केली असून एकमेकाला पूरक असे उमेदवार उभे केले आहेत. पण त्यांच्या

मॅच फिक्सिंगने भाजपाचा पराभव होऊ शकत नाही, असे आ. आशिष शेलार

यांनी यावेळी ठणकावले.

 

मुंबईला भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शी कारभार देण्यासाठी स्वबळावर निवडणूक जिंकायची आहे। 

मा. प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या

नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने

केलेल्या कामामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. राज्यात नगरपालिका निवडणुकीत

भाजपा नंबर वनचा पक्ष ठरला आहे. त्याचप्रमाणे महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत

भाजपा नंबर वन ठरेल.

त्यांनी सांगितले की, भाजपा सरकारचे काम आणि पक्षाचा अजेंडा याच्या जोरावर जनतेसमोर

जाऊन महापालिका व जिल्हा परिषद निवडणूक जिंकायची आहे. मुंबईला भ्रष्टाचारमुक्त व

पारदर्शी कारभार देण्यासाठी स्वबळावर निवडणूक जिंकायची आहे.

ते म्हणाले की, निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती व्हावी म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले पण

युती करणार नाही अशी एकतर्फी घोषणा त्यांनी केली.

 

भाजपाला पराभूत करणे हा शिवसेना व काँग्रेसचा एकच अजेंडा आहे। 

आ. आशिष शेलार यांनी सांगितले की, भाजपाला पराभूत करणे हा शिवसेना व काँग्रेसचा

एकच अजेंडा आहे. त्या दोन पक्षांनी एकमेकाला पूरक असे उमेदवार उभे करून

मॅच फिक्सिंग केले आहे. अशा ४२ जागा आपण नक्की सांगू शकतो. हा शिवद्रोह, मुंबईद्रोह व

महाराष्ट्र द्रोह आहे. पण तुमच्या मॅच फिक्सिंगने आमचा पराभव होऊ शकत नाही.

भाजपाची ताकद असलेल्या जागा तर जिंकूच शिवाय मॅच फिक्सिंग केलेल्या जागाही आम्ही जिंकू.

पारदर्शी कारभाराचा अजेंडा असल्याने भाजपा निवडणूक जिंकणारच आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाच्या विरोधात युद्ध सुरू केले म्हणून, मुंबईला

लुटणाऱ्या कंत्राटदारांना तुरुंगात टाकले म्हणून आणि मुंबई पालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर

आरोपपत्र दाखल केले म्हणून त्या पक्षाने आमची साथ सोडली,

असेही आ. आशिष शेलार म्हणाले.

महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकी, भाजपा नंबर वन, प्रदेशाध्यक्ष, खा. रावसाहेब पाटील दानवे,

Samaj Ki Vikas, Samaj Samvad, Samaj Ka Samvad, Samaj Ki Samvad, Vikas,

Society News, News of Development, Development News,

समाज, समाज विकास, समाज संवाद, विकास, विकास संवाद, संवाद,

samaj, samaj vikas, samaj samvad, vikas, vikas samvad, samvad,

व्यापार संवाद, आयुर्वेद संवाद, गैजेट्स संवाद, समाज विकास संवाद

1 COMMENT

Leave a Reply

Related articles

कांदा- सोयाबीन- धान उत्पादकांना केंद्राचा दिलासा! उप मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधानांचे आभार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने बळीराजासाठी आज असंख्य महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.त्यात खास करून कांदा, सोयाबीन, धान आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.या निर्णयाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले आहेत.

उद्धव ठाकरेंचा स्वीय सहायक पैसे घेऊन पद बिक्री करतो! – शिंदेसेना – भाजपचे गंभीर आरोप!

शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्यासह माजी खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते संजय निरुपम आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक (P.A) रवी म्हात्रे यांच्यावर गंभीर आरोप केले.

सहकार भारती, मीरा भाईंदर जिल्ह्याचा वतीने संस्थेच्या स्थापना दिवस साजरा!

सहकार भारती,  मीरा भाईंदर जिल्ह्याचा वतीने सहकार भारती चा स्थापना दिवस साजरा केला गेला .या कार्यक्रमाला सहकार भारती, मीरा भाईंदर च्या विविध प्रकोस्ट चे प्रमुख आणि सहकार भारतीचे कार्यकर्ते उपस्थित होते ...

“सहकार मिलन” – मीरा भायंदरच्या गृहनिर्माण पुनर्विकासात सहकार भारती कडून दिशा प्रदर्शन!

“सहकार मिलन” - मीरा भायंदरच्या गृहनिर्माण पुनर्विकासात सहकार भारती कडून दिशा प्रदर्शन!आंतरराष्ट्रीय सहकार दिनाचे (११ जानेवारी) औचित्य साधून, सहकार भारती, मीरा भाईंदर जिल्हा आणिश्री सिद्धिविनायक नगर वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने " सहकार मिलन " या कार्यक्रमाचे आयोजन८ जानेवारी २०२३ ला श्री सिद्धिविनायक वेल्फेअर असोसिएशनच्या, सभागृहात केले होते.