मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा रथ रवाना-प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील दाखवले हिरवा झेंडा!

Date:

Share post:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा रथ रवाना-प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील दाखवले हिरवा झेंडा!

Chariot of Chief Minister Devendra Fadnavis s Mahajanadesh Yatra leaves – State President Chandrakantdada Patil shows green flag!
समाज विकास संवाद,
मुंबई,

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा रथ रवाना-प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील दाखवले हिरवा झेंडा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 1 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या प्रस्तावित महाजनादेश यात्रेचा सुसज्ज रथ मंगळवारी मुंबईत भारतीय जनता पार्टी,

प्रदेश कार्यालयातून प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केला.

यावेळी उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे,

प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर, प्रदेश सचिव संजय उपाध्याय,

प्रदेश माध्यमविभाग प्रमुख व प्रवक्ते केशव उपाध्ये तसेच प्रवक्ते अवधूत वाघ उपस्थित होते.

महाजनादेश यात्रेसाठीचे रथ पक्षाचा विचार जनतेमध्ये पोहचवतील!

मा. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की,

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष गृहमंत्री अमित शाह आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी;

यापूर्वी यात्रांसाठी वापरलेल्या रथांचा वापर मा. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेसाठी करण्यात येत आहे.

मा. शिवराजसिंह चौहान यांनी सात वर्षे मध्य प्रदेशात जनसंपर्कासाठी हा रथ वापरला होता.

त्याची दुरुस्ती करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेसाठी वापरण्यात येणार आहे.

मा. राम नाईक म्हणाले की, महाजनादेश यात्रेसाठीचे रथ पक्षाचा विचार जनतेमध्ये पोहचवतील आणि;

आगामी विधानसभा निवडणुकीत विजय खेचून आणतील, असा आपल्याला विश्वास आहे.

पहिल्या टप्प्याचा समारोप नंदुरबार येथे होणार!

महाजनादेश यात्रेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे कर्मस्थान असलेल्या अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथून १ ऑगस्ट पासून प्रारंभ होणार आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे आणि;

लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधून  सुरु होणाऱ्या या यात्रेचा समारोप ३१ ऑगस्ट रोजी नाशिक येथे होणार आहे.

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र येथून एक ते नऊ ऑगस्ट दरम्यान पहिला टप्पा होणार असून;

या भागातील एकुण १४ जिल्ह्यात ही यात्रा जाणार आहे. या दरम्यान ५७ विधानसभा मतदार संघातून १,६३९ किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्याचा समारोप नंदुरबार येथे होणार आहे.

यात्रेचा दुसरा टप्पा १७ ऑगस्ट रोजी सुरु होईल. दुसऱ्या टप्प्यांत ही यात्रा १८ जिल्ह्यातल्या ९३ विधानसभा मतदारसंघात २,७४५ किलोमीटर एवढा प्रवास करणार आहे.

यात्रेचा एकूण प्रवास ३२ जिल्ह्यांतून ४,३८४ किलोमीटर एवढ्या अंतराचा असणार आहे.

दोन्ही टप्पे मिळून १५० विधानसभा मतदारसंघांमधून ही यात्रा जाणार आहे. या दरम्यान ८७ मोठ्या सभा,

५७ स्वागत  सभा होणार आहेत. याशिवाय एकुण २३८ पेक्षा अधिक  गावांमध्ये स्वागत स्वीकारून यात्रा नाशिक येथे पोहोचेल.

#मुख्यमंत्री, #देवेंद्र_फडणवीस, #महाजनादेश_यात्रा_रथ, #प्रदेशाध्यक्ष_चंद्रकांतदादा_पाटील,

Amazing Amazon News, Samaj Vikas Samvad, New India News, Samaj Ka Vikas,

समाज, समाज विकास, समाज संवाद, विकास, विकास संवाद, संवाद,

samaj, samaj vikas, samaj samvad, vikas, vikas samvad, samvad,

व्यापार संवाद, आयुर्वेद संवाद, गैजेट्स संवाद, समाज विकास संवाद

1 COMMENT

Leave a Reply

Related articles

कांदा- सोयाबीन- धान उत्पादकांना केंद्राचा दिलासा! उप मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधानांचे आभार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने बळीराजासाठी आज असंख्य महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.त्यात खास करून कांदा, सोयाबीन, धान आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.या निर्णयाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले आहेत.

उद्धव ठाकरेंचा स्वीय सहायक पैसे घेऊन पद बिक्री करतो! – शिंदेसेना – भाजपचे गंभीर आरोप!

शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्यासह माजी खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते संजय निरुपम आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक (P.A) रवी म्हात्रे यांच्यावर गंभीर आरोप केले.

सहकार भारती, मीरा भाईंदर जिल्ह्याचा वतीने संस्थेच्या स्थापना दिवस साजरा!

सहकार भारती,  मीरा भाईंदर जिल्ह्याचा वतीने सहकार भारती चा स्थापना दिवस साजरा केला गेला .या कार्यक्रमाला सहकार भारती, मीरा भाईंदर च्या विविध प्रकोस्ट चे प्रमुख आणि सहकार भारतीचे कार्यकर्ते उपस्थित होते ...

“सहकार मिलन” – मीरा भायंदरच्या गृहनिर्माण पुनर्विकासात सहकार भारती कडून दिशा प्रदर्शन!

“सहकार मिलन” - मीरा भायंदरच्या गृहनिर्माण पुनर्विकासात सहकार भारती कडून दिशा प्रदर्शन!आंतरराष्ट्रीय सहकार दिनाचे (११ जानेवारी) औचित्य साधून, सहकार भारती, मीरा भाईंदर जिल्हा आणिश्री सिद्धिविनायक नगर वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने " सहकार मिलन " या कार्यक्रमाचे आयोजन८ जानेवारी २०२३ ला श्री सिद्धिविनायक वेल्फेअर असोसिएशनच्या, सभागृहात केले होते.