सहकार भारती, मीरा भाईंदर जिल्ह्याचा वतीने संस्थेच्या स्थापना दिवस साजरा!
समाज विकास संवाद!
मुंबई,
सहकार क्षेत्रात काम करणार सहकार भारती एकमेव संस्था,
सहकार भारती, मीरा भाईंदर जिल्ह्याचा वतीने संस्थेच्या स्थापना दिवस साजरा केला गेला!
या कार्यक्रमाला सहकार भारती, मीरा भाईंदर च्या विविध प्रकोस्ट चे प्रमुख आणि
सहकार भारतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
स्थापना दिवसाच्या या कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून सहकार भारतीचे कोंकण प्रांताचे प्रमुख श्री शैलेशजी दुर्गुडे उपस्थित होते.
“राष्ट्रीय स्तरावर सहकार क्षेत्रात काम करणार सहकार भारती एकमेव संस्था” – कोंकण प्रांत प्रमुख श्री शैलेश दुर्गुडे!
शैलेशजीनी या कार्यक्रमात उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
सहकार भरतीचा इतिहास आणि वर्तमान कार्याची माहिती त्यांनी संक्षिप्त स्वरूपात दिली.
राष्ट्रीय स्तरावर सहकार क्षेत्रात काम करणार सहकार भारती एकमेव संस्था असल्याचे त्यांनी सांगितले.
सहकारातल्या विविध क्षेत्रात प्रशिक्षण देण्याचे काम सहकार भारतीचे आहे.
महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांच्या उत्पादनाच्या विपणन व्यवस्थे साठी ” सिम्पली देसी ” नावाचे
विपणन केंद्र सहकार भारती कडून सुरु केले गेले असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या “लोकल फॉर व्होकल” ब्रीद वाक्याची आठवण!
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहकार भारतीचे कार्याध्यक्ष श्री निलेश गोसावी यांनी केले.
“लोकल फॉर व्होकल” या पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या ब्रीद वाक्याची आठवण करून देत, बचत गटांच्या
स्थानिक उत्पादनांना ग्लोबल मार्केट प्रमाणे स्थानिक ठिकाणीच कसे मार्केट उपलब्ध करून देता येऊ शकते याचा आपण
प्रयत्न केला पाहिजे याची निलेश गोसावी यांनी माहिती दिली.
उपस्थितांचे स्वागत सहकार भारती, मीरा भाईंदर जिल्ह्याच्या महिला प्रकोष्टप्रमुख श्रीमती संध्याताई माने यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख श्री सुनील अगरवाल यांनी कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन केले.
…
समाज, समाज विकास, समाज संवाद, विकास, विकास संवाद, संवाद, समाज विकास संवाद,
samaj, samaj vikas, samaj samvad, vikas samvad, samvad, Samaj vikas samvad,
সমাজ, সমাজ বিকাস , সমাজ সংবাদ, বিকাস, বিকাস সংবাদ, সংবাদ, সমাজ বিকাস সংবাদ,