शिवसेना व काँग्रेसचा एकमेव अजेंडा – भाजपाला पराभूत करणे…आ. आशिष शेलार!

Date:

Share post:

शिवसेना व काँग्रेसचा एकमेव अजेंडा – भाजपाला पराभूत करणे…आ. आशिष शेलार!

समाज विकास संवाद!
मुंबई ,

शिवसेना व काँग्रेसचा एकमेव अजेंडा – भाजपाला पराभूत करणे…आ. आशिष शेलार!

भाजपाला पराभूत करणे हाच शिवसेना व काँग्रेसचा एकमेव अजेंडा आहे ,

या दोन्ही पक्षांनी एकमेकाला पूरक असे उमेदवार उभे करून मॅच फिक्सिंग केले आहे

अशा ४२ जागा आपण नक्की सांगू शकतो;

मी दोन्ही पक्षांची यादी घेऊन अभ्यास केल्यानंतर माझ्या हे लक्षात आले हा शिवद्रोह,

मुंबईद्रोह व महाराष्ट्र द्रोह आहे! पण तुमच्या मॅच फिक्सिंगने आमचा पराभव होऊ शकत नाही;

भाजपाची ताकद असलेल्या जागा तर जिंकूच शिवाय अशा मॅच फिक्सिंग केलेल्या जागाही आम्ही जिंकू।

विलेपार्ले येथील पुनम कुबल या काँग्रेस कार्यकत्या काल मला भेटल्या. त्यांना काँग्रेसने

उमेदवारी दिली होती। ऐनवेळी  ती रद्द करून सेनेच्या समोरच्या उमेदवाराला पुरक उमेदवार

देण्यात  आला। या कुबल ज्यावेळी बोलत होत्या  त्यावेळेस  माझ्या हे लक्षात आले म्हणून मी

दोन्ही याद्यांचा अभ्यास केला तेव्हा हे मॅच फिक्सिंग समोर आले. करा या बद्दल खुली चर्चा,

मी तयार आहे, असे आव्हान त्यांनी दोन्ही पक्षांना दिले।

एकदा बांद्रा पूर्वे कडून दादरच्या कृष्णकुंजला तर कधी कृष्णकुंजवरून बांद्रा पूर्व ला निरोप

पाठवून पाहिले पण यश आले नाही. म्हणूनच आता हे नवे मॅच फिक्सिंग केले आहे,

असा गंभीर आरोप त्यांनी केला।

 

महाभारतात शकुनी मामाही आहे..  जीतम् मया…जीतम् मया!

या महाभारतात शकुनी मामाही आहे-  जीतम् मया…जीतम् मया.. असे म्हणत शकुनी मामा

फासे टाकतो आहे ते कधी कृष्णकुंजकडे तर कधी जाणता राजाच्या दिशेने पडत आहेत

तर कधी फासे दोपहारच्या माजी संपादकाच्या बाजूने पडत आहेत, असा आरोप करीत

हे निवडणूकीपुर्वी दशा दर्शन सुरू आहे, असे ते म्हणाले. पारदर्शी कारभाराचा अजेंडा

असल्याने भाजपा निवडणूक जिंकणारच आहे।

 

आम्हाला विरोध का करता?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाच्या विरोधात युद्ध सुरू केले म्हणून,

मुंबईला लुटणाऱ्या कंत्राटदारांना तुरुंगात टाकले म्हणून? मुंबई पालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर

आरोपपत्र दाखल केले म्हणून? आम्ही डम्पिंग ग्राऊंड आणि पाणी चोरी करणाऱ्यांच्या

विरोधात एसआयटी लावली म्हणून आम्हाला विरोध? मुंबईकरांना चांगले रस्ते मिळावेत

म्हणून आम्ही कंत्राटदारांचा भ्रष्टाचार उघड केला म्हणून आम्हाला मित्र पक्ष विरोध करतो

आहे काय? असा सवाल त्यांनी केला।

म्हणुनच मित्रपक्षाने आमची साथ सोडली असेही आ. आशिष शेलार म्हणाले.

उमेदवारांशी संवाद साधताना म्हणाले की,1 कोटी 40 लाख लोकांना सेवा देणारी महापालिकेत

तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून येणार आहात त्यावेळी तुमच्यावर जबाबदारी वाढते आहे.

त्याची जाणिव ठेवा. जनतेचे सेवक म्हणून काम करणार आहोत. आपल्यासाठी सत्ता हे साधन

आहे हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले  आहे लक्षात ठेवा असेही त्यांनी नमूद केले.

 

भाजपाच्या अध्यक्षांनी ही लढाई  फ्रेंडली आहे असे म्हटले!

भाजपाच्या अध्यक्षांनी ही लढाई  फ्रेंडली आहे असे म्हटले पण समोरच्या अहंकारी स्वभावाला

ते पटले नाही. त्यांनी  इथेही  अहंकार  दाखवला. पण मराठी माणूस सुसंस्कृत आहे।

भाजपाने जे सुसंस्कृत मन दाखवले आहे त्याच्या पाठीशीच मराठी माणूस उभा राहिल,

असा विश्वास आमदार  अॅड आशिष शेलार यांनी व्यक्त् केला।

भाजपाचा जाहीरनामा लवकर येईल.  त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जनतेकडून सुचना मागितल्या

सुमारे 6 लाख लोकांनी सहभाग नोंदवला. भाजपाचा जाहीरनामा तयार करण्यात येतो आहे;

भाजपाचा जाहीरनामा मुंबईकरांचा जाहीरनामा असेल. तो पारदर्शक कारभाराची

ग्वाही  देणारा असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रचाराचा नारळ वाढवताना काहीजण छत्रपती शिवाजी महाराजांना विसरले. कोण आणखी

कुणाला विसरले पण भाजपाने हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून प्रचाराला सुरूवात

केली आहे.  आपण जबाबदारीची जाणीव ठेवून वागतो आहोत.

आपण मुंबईकरांसाठी  ही लढाई लढत आहोत याचे भान सदैव ठेवा , असे आवाहन त्यांनी केले

शिवसेना, काँग्रेसचा, भाजपा, आशिष शेलार, #समाज_विकास_संवाद, #समाज_का_विकास,

Gadget Samvad, science-technology Samvad, Global Samvad,

समाज, समाज विकास, समाज संवाद, विकास, विकास संवाद, संवाद,

samaj, samaj vikas, samaj samvad, vikas, vikas samvad, samvad,

Amazon Prime News, व्यापार संवाद, आयुर्वेद संवाद, गैजेट्स संवाद, समाज विकास संवाद

Leave a Reply

Related articles

कांदा- सोयाबीन- धान उत्पादकांना केंद्राचा दिलासा! उप मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधानांचे आभार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने बळीराजासाठी आज असंख्य महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.त्यात खास करून कांदा, सोयाबीन, धान आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.या निर्णयाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले आहेत.

उद्धव ठाकरेंचा स्वीय सहायक पैसे घेऊन पद बिक्री करतो! – शिंदेसेना – भाजपचे गंभीर आरोप!

शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्यासह माजी खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते संजय निरुपम आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक (P.A) रवी म्हात्रे यांच्यावर गंभीर आरोप केले.

सहकार भारती, मीरा भाईंदर जिल्ह्याचा वतीने संस्थेच्या स्थापना दिवस साजरा!

सहकार भारती,  मीरा भाईंदर जिल्ह्याचा वतीने सहकार भारती चा स्थापना दिवस साजरा केला गेला .या कार्यक्रमाला सहकार भारती, मीरा भाईंदर च्या विविध प्रकोस्ट चे प्रमुख आणि सहकार भारतीचे कार्यकर्ते उपस्थित होते ...

“सहकार मिलन” – मीरा भायंदरच्या गृहनिर्माण पुनर्विकासात सहकार भारती कडून दिशा प्रदर्शन!

“सहकार मिलन” - मीरा भायंदरच्या गृहनिर्माण पुनर्विकासात सहकार भारती कडून दिशा प्रदर्शन!आंतरराष्ट्रीय सहकार दिनाचे (११ जानेवारी) औचित्य साधून, सहकार भारती, मीरा भाईंदर जिल्हा आणिश्री सिद्धिविनायक नगर वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने " सहकार मिलन " या कार्यक्रमाचे आयोजन८ जानेवारी २०२३ ला श्री सिद्धिविनायक वेल्फेअर असोसिएशनच्या, सभागृहात केले होते.