वनेत्तर क्षेत्रातील वृक्षाच्छादनात महाराष्ट्र देशात प्रथम-९७५ चौ.कि.मीची वाढ!
माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हरित महाराष्ट्रासाठीच्या ध्येयनिष्ठ वाटचालीचे फलित!
Maharashtra’s first increase in tree cover in the non-forest area – 975 sq. Km.
समाज विकास संवाद!
मुंबई,
वनेत्तर क्षेत्रातील वृक्षाच्छादनात महाराष्ट्र देशात प्रथम-९७५ चौ.कि.मीची वाढ, कांदळवन क्षेत्रात १६ चौ.कि.मी ची वाढ, “माय प्लँट” नावाचे मोबाईल ॲप वन विभागाने विकसित केले होते,
वनेत्तर क्षेत्रातील वृक्षाच्छादनात महाराष्ट्रात ९७५ चौ.कि.मी ची वाढ नोंदविण्यात आली असून महाराष्ट्र या क्षेत्रात देशात प्रथम क्रमांकावर आहे!
तर वनाच्छादनामध्ये ही ९६ चौ.कि.मी ची वाढ नोंदवण्यात आली असून महाराष्ट्र या क्षेत्रात ही आघाडीवर राहिला आहे.
देशातील वनक्षेत्र आणि वृक्षाच्छादनाबाबत फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाचा दर दोन वर्षांनी वनस्थिती अहवाल जाहीर करण्यात येतो.
२०१७ ते २०१९ मधील वनस्थिती अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला असून त्यात ही माहिती देण्यात आली आहे.
तत्कालीन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हरित महाराष्ट्राचा ध्यास घेऊन राज्यातील
वनक्षेत्र ३३ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी व्यापक लोकसहभाग मिळवला आणि
तीन वर्षात ५० कोटी वृक्षलागवडीचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राज्यभर राबविला,
आता त्याची दृष्यफलिते दिसून येऊ लागली आहेत.
कांदळवन क्षेत्रात १६ चौ.कि.मी ची वाढ!
कांदळवन क्षेत्रात १६ चौ.कि.मी ची वाढ!
कांदळवने ही पर्यावरण समतोलामध्ये महत्वाची भूमिका बजावतात.
जलचरांचे पुनरुत्पादन आणि अधिवास कांदळवनात जोपासला आणि बहरला जातो.
राज्याच्या वन विभागाने स्वतंत्र कांदळवन कक्षाची निर्मिती करून कांदळवन संरक्षण आणि संवर्धनाला गती दिली आहे.
कांदळवनातील उपजीविका, रोजगारनिर्मिती आणि त्याद्वारे सागरतटीय जिल्ह्यांमधील स्थानिकांचे
आर्थिक सक्षमीकरण यास विभागाने चालना दिली आहे. त्यामुळेच २०१९ च्या फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या अहवालात
राज्यातील कांदळवनक्षेत्रात १६ चौ.कि.मी ची वाढ नोंदविण्यात आली आहे. महाराष्ट्र यात देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
१ लाख ४७ हजार ८१४ हेक्टर क्षेत्र नव्याने राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित!
फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या या अहवालात २०१४ ते २०१९ या कालावधीत १,४७,८१४ हेक्टर क्षेत्र नव्याने राखीव वन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात
आल्याबद्दल महाराष्ट्राचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे.
पर्यावरण समतोल आणि संरक्षणाच्यादृष्टीने महाराष्ट्राच्या भरीव कामगिरीची दखल या अहवालात घेण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचीही अहवालात नोंद
महाराष्ट्राने वन आणि वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनासाठी उपयोगात आणलेल्या माहिती
तंत्रज्ञान सुविधांचा अहवालात आवर्जुन उल्लेख करण्यात आला आहे. माय प्लँट ॲप,
महाराष्ट्र हरित सेना, हॅलो फॉरेस्ट १९२६ आणि वन आणि वन्यजीव संवर्धनात समाजातील विविध घटकांचा सहभाग
यासारख्या नावीन्यपूर्ण उपक्रमांबद्दलची नोंद या अहवालात विशेषत्वाने घेण्यात आली आहे.
माय प्लँट
राज्यातील वन आणि वन्यजीव संवर्धनात लोकसहभाग वाढावा, वृक्षलागवडीचे काम अतिशय पारदर्शकपद्धतीने व्हावे यासाठी
वन विभागाने माहिती तंत्रज्ञानावर आधारित संगणक आज्ञावली विकसित केली,
ज्यामध्ये लावलेल्या वृक्षाची अक्षांश-रेखांशासह नोंद करणे शक्य झाले.
यामुळे वृक्षलागवडीमध्ये राज्यातील नागरिकांची विश्वासार्हता वाढली.
शासकीय निमशासकीय विभागांप्रमाणे समाजातील अनेक घटक वृक्षलागवड मोहिमेत सहभागी झाले होते.
त्यांनी केलेली वृक्षलागवड वन विभागाकडे नोंदवली जावी म्हणून “माय प्लँट” नावाचे मोबाईल ॲप वन विभागाने विकसित केले होते.
या ॲपद्वारेही विविध समाज घटकांनी लावलेल्या वृक्षांची नोंद वन विभागाकडे झाली आहे.
हॅलो फॉरेस्ट १९२६
वन आणि वन्यजीव संवर्धनात लोकसहभाग वाढावा या हेतूने वन विभागाने “हॅलो फॉरेस्ट १९२६” ही देशातील पहिली हेल्पलाईन सुरु केली होती.
आतापर्यंत जवळपास १ लाख लोकांनी या कॉलसेंटरमार्फत विविध विषयांवर माहिती प्राप्त करून घेतली आहे.
१ कोटी ची हरित सेना
पर्यावरण रक्षणासाठी देशातील सर्वात मोठी एक कोटी लोकांची “हरित सेना” महाराष्ट्रात निर्माण करण्याच्या उद्देशाने
वन विभागाने राज्यात “महाराष्ट्र हरित सेने”ची स्थापना केली.
यात राज्यातील नागरिकांना सहजरित्या नाव नोंदवता यावे यासाठी हे संकेतस्थळ ही सुरु करण्यात आले आहे.
आतापर्यंत राज्यात ६३ लाख लोकांनी हरित सेनेत आपली नाव नोंदणी केली आहे.
राज्यात झालेल्या ५० कोटी वृक्षलागवडीत जवळपास दीड कोटी लोकांनी मागील तीन वर्षात सहभाग नोंदवला.
राज्यात ५६.५४ कोटी वृक्ष लागले. वृक्षलागवड ही खऱ्याअर्थाने लोकचळवळ झाल्याचे यानिमित्ताने दिसून आले.
वन विभागाने बांबू क्षेत्राच्या विकासाला, तूती लागवडीला आणि फळझाड लागवडीला ही प्रोत्साहन देऊन या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या.
वनक्षेत्र वाढतांना राज्यातील नागरिकांचे आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत ही विकसित व्हावा हा त्यामागचा हेतू आहे.
…
#समाज_विकास_संवाद, #समाज_का_विकास, आज तक ताजा खबर, आज की ताजा खबर,
Amazing Amazon News, Samaj Vikas Samvad, New India News, Samaj Ka Vikas,
व्यापार संवाद, आयुर्वेद संवाद, गैजेट्स संवाद, समाज विकास संवाद,
समाज, समाज विकास, समाज संवाद, विकास, विकास संवाद, संवाद,
samaj, samaj vikas, samaj samvad, vikas, vikas samvad, samvad
[…] महाराष्ट्र मे राष्ट्रिय सयंसेवक संघ वू निरामय फ़ाउंडेशन द्वारा कोरोना संक्रमितों की थर्मल स्क्रीनिंग अभियान। […]