“सहकार मिलन” – मीरा भायंदरच्या गृहनिर्माण पुनर्विकासात सहकार भारती कडून दिशा प्रदर्शन!
समाज विकास संवाद!
मुंबई,
“सहकार मिलन” – मीरा भायंदरच्या गृहनिर्माण पुनर्विकासात सहकार भारती कडून दिशा प्रदर्शन!
आंतरराष्ट्रीय सहकार दिनाचे (११ जानेवारी) औचित्य साधून, सहकार भारती, मीरा भाईंदर जिल्हा आणि
श्री सिद्धिविनायक नगर वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ” सहकार मिलन ” या कार्यक्रमाचे आयोजन
८ जानेवारी २०२३ ला श्री सिद्धिविनायक वेल्फेअर असोसिएशनच्या, सभागृहात केले होते.
मीरा भाईंदर मधिल अनेक गृहनिर्माण संस्थांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
“इमारतींच्या पुनर्विकास प्रक्रियेत अनेकवेळा फसवणूक केली जाते” – सहकार भारती कार्याध्यक्ष निलेश गोसावी!
जागतिक सहकार दिना निमित्त आयोजित “सहकार मिलन” कार्यक्रमा मध्ये ‘जुन्या इमारतींचा पुनर्विकास आणि
सोसायटी अभिहस्तांतरण (कन्व्हेयन्स) ‘ या विषयांचे चर्चासत्र आयोजित केले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून श्री राहुल पाटील (सहप्रमुख, राष्ट्रीय हौसिंग प्रकोष्ट, सहकार भारती) तसेच
श्रीमती अश्विनी बुलाख (सहप्रमुख, महाराष्ट्र हौसिंग प्रकोष्ट, सहकार भारती) हे उपस्थित होते .
सदर चर्चासत्रात श्री राहुल पाटील यांनी इमारतींचा पुनर्विकास करताना येणाऱ्या विविध समस्या आणि
त्यांचे निराकरण कसे करायचे तसेच इमारतीच्या पुनर्विकासाची प्रक्रिया कश्या प्रकारे करायची याची विस्तृत
माहित उपस्थित गृहनिर्माण संस्थांच्या पधादिकार्यांना आणि सदस्यांना दिली.
श्रीमती अश्विनी बुलाख यांनी, जमीन आणि इमारतीचे शीर्षक हस्तांतरण हा एक महत्वाचा दस्तावेज आहे,
जो हौसिंग सोसायटीच्या सामान्य भागांची कायदेशीर मालकी सिद्ध करण्यासाठी आणि
पुनर्विकास प्रकल्प हाती घेण्यासाठी किती महत्वपूर्ण आहे सखोल माहिती दिली.
तसेच सोसायटी अभिहस्तांतरण (कन्व्हेअन्स) आणि मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेअन्स) यामधील फरक
सांगून याची ही माहिती उपस्थित सभासदांना दिली.
इमारतींच्या पुनर्विकास प्रक्रियेत अनेकवेळा फसवणूक केली जाते .
त्यामुळे अनेक इमरतींचा पुनर्विकास रखडलेला दिसतो तसेच सोसायटी अभिहस्तांतरण (कन्व्हेअन्स) आणि
मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेअन्स) करतानाही आर्थिक लुबाडणूक ही होत असते.
यावर अंकुश ठेवण्याचे काम सहकार भारती करेल, असे प्रतिपादन मीरा भाईंदर चे कार्याध्यक्ष
श्री निलेश गोसावी यांनी सदर कार्यक्रमात केले.
मीरा भाईंदर मध्ये सहकार क्षेत्रातील विविध सहकारी संस्था कार्यरत!
मीरा भाईंदर मध्ये सहकार क्षेत्रातील विविध गृहनिर्माण सहकारी संस्था, ग्राहक सोसायटी, पतसंस्था,
सहकारी बँका, मच्छीमार व शेतकरी सहकारी संस्था, महिला बचत गट तसेच इतर सहकारी संस्था कार्यरत आहेत.
त्यामुळे मीरा-भाईंदर हे सहकाराच्या प्रत्येक क्षेत्राशी निगडित आहे.
सहकार भारती सहकार क्षेत्रातील विविध संस्थांना मार्गदर्शन करत आलेली आहे.
तसेच त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे काम ही करत आहे.
या कार्यक्रमाला उदघाटक हे श्री शरद जाधव ( सहकार भारती- महाराष्ट्र सह संगठन प्रमुख ) हे होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र सहा संगठन प्रमुख, सहकार भारती, श्री प्रवीण जी बुलाख होते.
कार्यक्रम प्रमुख म्हणून श्री विनायक शेट्टी आणि त्यांच्या टीम ने कार्यक्रमाची व्यवस्था उत्तम केली होती.
सदर कार्यक्रमाला मीरा भाईंदर च्या महिला प्रकोस्ट प्रमुख श्रीमती संध्याताई माने आणि
सहकार भारतीच्या मीरा भाईंदर मधील कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली.
विशेषतः सहकार भारतीचे मुंबई सहप्रमुख श्री मंगेश पवार यांचे विशेष सहकार्य लाभले.
…
मीरा भायंदरच्या गृहनिर्माण पुनर्विकास,
समाज, समाज विकास, समाज संवाद, विकास, विकास संवाद, संवाद, समाज विकास संवाद,
samaj, samaj vikas, samaj samvad, vikas samvad, samvad, Samaj vikas samvad,
সমাজ, সমাজ বিকাস , সমাজ সংবাদ, বিকাস, বিকাস সংবাদ, সংবাদ, সমাজ বিকাস সংবাদ,