समाज विकास साठी सेवा व समर्पण चे मुर्तिमंत उदाहरण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी!

Date:

Share post:

समाज विकास साठी सेवा व समर्पण चे मुर्तिमंत उदाहरण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

डॉ. स्वप्नील बी. मंत्री

(बाल रोग तज्ञ)

 

समाज विकास संवाद!
मुंबई,

 

समाज विकास साठी सेवा व समर्पण चे मुर्तिमंत उदाहरण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्यानी योग साठी पुढाकार – म्हणजे ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’, समाज विकास साठी मन की बात, विकास साठी सेवा व समर्पण-स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियान सहित अनेक दिग्दर्शी उपक्रम राबवले।
आपल्या या संपूर्ण कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपप्रणित एनडीए सरकारनं
भारतीय राजकारणात हे उपक्रम दिशादर्शक व सामान्य माणसाच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणण्यात महत्वपूर्ण बदल म्हणून गणले गेले।
याच उपक्रमांचा सेवा व समर्पण अभियान अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकीर्दीला 20 वर्षे पुर्ण होत असतांना आपण आढावा घेणार आहोत।

समाज विकास साठी सेवा व समर्पण!

सामान्यांना परवडणारी आरोग्य सेवा – ‘राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा योजना’- ‘आयुष्यमान भारत योजना, पीएमजय’!

समाज विकास साठी सेवा व समर्पण! सामान्यांना परवडणारी आरोग्य सेवा!
सरकारनं आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या वर्गाला अत्याधुनिक आरोग्यसुविधा परवडणाऱ्या दरात मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले।
त्यासाठी सरकारनं ‘राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा योजना’ लॉन्च केली, याच योजनेला ‘आयुष्यमान भारत योजना, पीएमजय’ म्हणूनही संबोधलं जातं।
या अंतर्गत ५० कोटी कमी उत्पन्न गटातील नागरिकांना ५ लाखांपर्यंतचा मेडिकल इन्शुरन्स देण्यात आला।
यासाठी वार्षिक १०,००० कोटींचं बजेटही राखून ठेवण्यात आलं. हा जगातील सर्वात मोठा वैद्यकीय कार्यक्रम ठरला।
या उपक्रमांतर्गत सरकारनं हजारो औषधांच्या किंमती कमी करण्यासाठी प्रयत्न केले,
तसेच जेनरिक औषधांची प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना दुकानं सुरु करण्याला प्रोत्साहन दिलं।

समाज विकास साठी सेवा!  ‘योग’ साठी पुढाकार – ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’!

योग साठी पुढाकार – ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’!
योगासनं हा प्राचीन भारतातील एक शारीरिक आणि मानसिक सुदृढता व समृद्धतेचा व्यायाम प्रकार आहे।
याचा जगभरात प्रसार व्हावा आणि जगातील लोकांनी दररोज याचा सराव करावा या साठी मोदी सरकारने जाणीवपूर्वक प्रयत्न केले।
भारताच्या प्रयत्नांमुळे संयुक्त राष्ट्रांनी २१ जून हा दिवस योग साठी पुढाकार घेवून ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून घोषित केला।
तेव्हापासून या दिवशी जगभरात मोठ्या उत्साहानं विविध कार्यक्रमांद्वारे योग दिवस पाळला जातो।
योग साठी या दिवशीच्या राष्ट्रीय कार्यक्रमांत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः नेतृत्व करत असतात।

जनधन योजना आणि उज्वला योजना!

देशातील जनतेनं अर्थव्यवस्थेत थेट सहभाग घ्यावा यासाठी मोदी सरकारनं ‘झिरो बॅलन्स बँक अकाउंट’ उघडण्याची योजना आखली।
याद्वारे सरकारकडून होणाऱ्या मदतीचे किंवा अनुदानाचे थेट बँक खात्यात हस्तांतरण करण्यात येणार होतं।
यामुळे जनतेला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याचा उद्देश मांडण्यात आला होता,
याला सरकारनं ‘जनधन योजना’ असं नाव दिलं. या योजनेंतर्गत देशात १३२ मिलियन नवी बँक खाती खोलण्यात आली।
त्याचबरोबर ‘प्रधानमंत्री उज्वला योजना’ ही एक महत्वपूर्ण योजना सरकारनं लागू केली।
याअंतर्गत 8 कोटींहून अधिक दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅसचे कनेक्शन केवळ १,६०० रुपयांमध्ये देण्यात आले।
हे कनेक्शन घरातील स्त्रीच्या नावाने देण्यात आले,
यासाठी संबंधीत महिलेच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम हस्तांतरित करण्याची योजना आखण्यात आली।

विकास साठी सेवा व समर्पण! मेक इन इंडिया’, ‘एफडीआय’, ‘स्टर्टअप इंडिया’, ‘मुद्रा योजना’ आणि ‘ब्रँड इंडिया’!

या संकल्पनेला मोदींच्या कार्यकाळात गती मिळाली।
सरकारनं ‘मेक इन इंडिया’ प्रकल्प सुरु करुन जागतिक गुंतवणुकीला भारताकडे आकर्षित करुन घेण्यासाठी प्रयत्न केले।
या योजनेंतर्गत सरकारनं २५ विविध क्षेत्रांमध्ये थेट परकीय गुंतवणुकीबाबत उदारिकरणाचं धोरणं अवलंबलं।
याचा परिणाम म्हणजे वर्ल्ड बँकेच्या ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’च्या रँकिंगमध्ये भारताचं स्थान उंचावलं।
यामुळे भारतानं ‘भारतमाला’, ‘सागरमाला’, ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर्स’, ‘इंडस्ट्रियल कॉरिडॉर्स’, ‘उडाण’, ‘भारत ब्रॉडबँड नेटवर्क’ आणि ‘डिजिटल इंडिया’ या प्रकल्पांना मदत झाली।
या प्रकल्पांतर्गत सरकारनं देशातील तरुण नवउद्योजकांच्या नव्या कल्पनांना वाव देऊन सरकारला मदत करण्याचं आवाहन केलं।
यासाठी सरकारनं ‘स्टार्टअप इंडिया’ हा प्रमुख कार्यक्रम सुरु केला. नवे छोटे उद्योग स्थापन्याला यामुळे चालना मिळाली।
त्यासाठी सरकारने अनेक सवलतीही लागू केल्या, यानंतर ‘प्रधानमंत्री मुद्रा योजना’ ही एक चांगली योजना मोदी सरकारनं सुरु केली।
या योजनेंतर्गत लघु उद्योगांच्या स्थापनेसाठी १०० टक्के कर्ज मिळू लागलं तसेच त्यांना नियमांमध्ये
सवलतीही देण्यात आल्या, यामुळे देशात नागरी आणि ग्रामीण भागात रोजगार निर्माण होऊ लागले।

विकास साठी डिजिटल इंडिया, युनायटेड पेमेंट इंटरफेस (यु पी आय), ‘भीम अप्प” आणि ‘भारत पे’!

भारतात इंटरनेटचा वापर वाढून सर्व सुविधा डिजिटल करता याव्यात यासाठी मोदी सरकारनं महत्वाचं पाऊल उचललं।
डिजिटल क्षेत्राला प्राधान्य देण्यासाठी सरकारनं ‘डिजिटल इंडिया’ ही योजना आणली।
याद्वारे इंटरनेट सेवा सर्वसामान्य लोकांना स्वस्तात आणि सहज उपलब्ध झाली,
या योजनेचा देशातील ५०० मिलियन हून जास्त युजर्स सध्या लाभ घेत आहेत, असा सरकारचा दावा आहे।
तसेच या योजनेंतर्गत मोदी सरकारनं जनतेच्या उपयोगासाठी अनेक मोबाईल एप्लिकेशन आणि वेबसाईटची निर्मिती करत डिजिटलला प्राधान्य दिलं।
या साठी युनायटेड पेमेंट इंटरफेस (युपीआय) आणि रुपे कार्डला प्रत्यक्ष डिजिटल पेमेंट आणि ऑनलाईन आर्थिक व्यवहार क्षेत्रात आणलं,
सरकारनं यासाठी ‘भीम अप्प” आणि ‘भारत पे’ नावाचे प्लॅटफॉर्मही आणले।

विकास साठी वीज आणि रस्त्यांचं विस्तारीकरण!

ग्रामीण भागातील अतिदृर्गम भागांपर्यंत वीज कनेक्शन पोहोचवायचा महत्वपूर्ण निर्णय मोदी सरकारनं आपल्या कार्यकाळात घेतला।
त्यानुसार मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भाग इलेक्ट्रिसिटी ग्रीडशी जोडला गेला, त्याचबरोबर नागरी तसेच ग्रामीण भागातील
रस्त्यांच्या निर्मितीचा वेग वाढवण्यावरही मोदी सरकारनं भर दिला।
त्यामुळे प्रतिदिन ४० किमी इतक्या अंतराचे रस्ते तयार केले जाऊ लागले. हा दर आधीच्या सरकारमध्ये १७ किमी प्रतिदिन इतका होता।

 

समाज विकास साठी सेवा व समर्पण जी एस टी ची अंमलबजावणी। 

मोदी सरकारनं देशात विविध कर प्रणाली संपुष्टात आणून एकच कर प्रणाली म्हणजे वस्तू आणि सेवा कर अर्थात,
‘जी एस टी’ आणण्याासाठी प्रयत्न केले।
हे विधेयक विविध कारणांमुळं अनेक काळ संसदेत मंजुरीसाठी अडकून पडलं होतं।
त्यानंतर विविध घटकांशी चर्चा करुन आणि संसदेतील आपल्या खासदारांच्या बळाच्या जोरावर मोदी सरकारनं
ही चांगली योजना पुढे नेण्यासाठी ‘जी एस टी विधेयक दोन्ही सभागृहात मंजुर करुन घेतलं आणि त्याची अंमलबजावणी केली।
विविध करांची रचना मोडीत काढून एकच कर रचना देशात लागू करुन मोदी सरकारनं एक महत्वाचं पाऊल उचललं आहे।

समाज विकास साठी मन की बात!

समाज विकास साठी मन की बात!
देशाचा सर्वोच्च नेता आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यामध्ये नेहमी थेट संवाद रहावा असा प्रयत्न
भारतात पहिल्यांदाच मोदी सरकारच्या कार्यकाळात करण्यात आला।
यासाठी सर्वाधिक जनतेपर्यंत पोहोचणारं ‘ऑल इंडिया रेडिओ’ हे माध्यम ठरवण्यात आलं।
या रेडिओच्या माध्यमातून पंतप्रधान आणि जनता यांच्यातील संवादरुपी कार्यक्रम ‘मन की बात’ जन्माला आला।
प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा कार्यक्रम आकाशवाणीवरुन प्रसारित होत असतो।
‘मन की बात’ या २० मिनिटांच्या कार्यक्रमातून सरकारच्या महत्वाच्या कामांची माहिती दिली जाते।
देशाच्या कानाकोपऱ्यातील दखलपात्र छोट्या-मोठ्या घटनांचा आढावा यात घेतला जातो।
जनतेकडून विषय विचारले जातात, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या जातात।
‘मन की बात’च्या पहिल्या एपिसोडमध्ये (ऑक्टोबर २०१४) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छतेवर भाष्य केलं होतं।
तर नोव्हेंबर २०१८ मध्ये राज्यघटनेवर चर्चा केली होती।
आजपर्यंत या कार्यक्रमासाठी रस्ते सुरक्षा ते बेटी बचाओ, बेटी पढाओ सारख्या ६१,००० कल्पना जनतेनं दिल्या आहेत।
त्यामध्ये युवकांचा जास्त समावेश आहे, देशात सामाजिक बदल घडवून आणण्यात ‘मन की बात’ चे महत्वपूर्ण योगदान आहे।

समाज विकास साठी सेवा व समर्पण स्वच्छ भारत अभियान!

समाज विकास साठी सेवा व समर्पण स्वच्छ भारत अभियान!

देशात सार्वजनिक स्वच्छते बाबत मोठा संदेश जावा या हेतूनं सत्तेत आल्यानंतर आणि पंतप्रधानपदी विराजमान

झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी २ ऑक्टोबर २०१४ रोजी गांधी जयंतीनिमित्त ‘स्वच्छ भारत’ अभियानं सुरु केलं।
यासाठी मोदी स्वतः हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरल्याचं पहायला मिळालं।
देशात नागरी आणि ग्रामीण भागात स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाच मोठा प्रश्न आहे।
यावर भर देताना प्रत्येक नागरिकानं रस्त्यांची आणि परिसराची स्वच्छता राखण्यासाठी जबाबदार असायला हवं असा संदेश या अभियानातून देण्यात आला।
या अभियानाच्या लोगोसाठी सुरुवातीला एक स्पर्धा घेण्यात आली त्याला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला।
यातून राष्ट्रपिता म. गांधी यांचा चष्मा आणि या चष्म्याच्या काचांवर ‘स्वच्छ भारत’ असे शब्द असलेला लोगो निश्चित करण्यात आला।
ग्रामीण भागात उघड्यावर शौचास जाणं बंद व्हाव, जेणेकरुन साथीचे आजार टाळता येतात यासाठी प्रत्येक घरात स्वच्छतागृह बांधण्यासाठी सरकारनं अनुदान सुरु केलं।
याचा देशात मोठा परिणाम झाला आणि अनेकांनी या योजनेचा लाभ घेऊन स्वच्छतागृह बांधले आणि वापरायलाही सुरुवात केली।
या संपूर्ण मोहिमेला बळ देण्यासाठी आणि पैसा उभारण्यासाठी सेवा करामध्ये ‘स्वच्छ भारत’ सेसही लागू करण्यात आला।
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी गेल्या वर्षी २ ऑक्टोबर रोजी केलेल्या भाषणात हे जाहीर केलं होतं की,
देशातील २५ हून जास्त राज्ये आता ‘हगणदारीमुक्त’ झाली आहेत।

समाज विकास साठी सेवा व समर्पण बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान। 

“बेटा बेटी, एक समान”
हा आपला मंत्र असला पाहिजे,
“आपण मुलीच्या जन्माचे स्वागत करुया आणि मुलीचा जन्म झाल्याचे स्वागत करताना 5 झाडे लावा असे आवाहन मी तुम्हाला करतो”
– पंतप्रधान नरेंद्र मोदी
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे; त्यांनी दत्तक घेतलेल्या जयापूर गावातील वक्तव्य।
“बेटी बचाओ, बेटी पढाओ” हया उपक्रमाची हरियाणतल्या पानिपत इथे 22 जानेवारी 2015 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ झाला।
या उपक्रमात बाल सिंग गुणोत्तरात (CSR) होणाऱ्‍या घसरणीवर तसेच महिला सक्षमीकरण संदर्भातल्या मुद्दयांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे।
महिला आणि बाल कल्याण्य, आरोग्य-कुटुंब कल्याण तसेच मनुष्यबळ विकास या तीन मंत्रालयाचा हा संयुक्त उपक्रम आहे।
पीसी आणि पीएनटीडी कायद्यांची अंमलबजावणी देशभर जागृती आणि सल्ला मोहीम राबवणे तसंच
बाल लिंग गुणोत्तराचं प्रमाण कमी असणाऱ्‍या 100 जिल्हयात बहु-विभागीय उपाययोजना करणे यांचा पहिल्या टप्प्‍यात समावेश आहे।
प्रशिक्षण, जनजागृती मध्ये वाढ करणे तसच सामुहिक एकत्रीकरण याद्वारे मानसिकतेत बदल करण्यावर सर्वात जास्त भर देण्यात आला आहे।
समाजाच्या मुलींकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात मोठा बदल घडवून आणण्याचा राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा प्रयत्न आहे।
बिबिपूर इथल्या सरपंचाने हाती घेतलेल्या “सेल्फी विथ डॉटर” या उपक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या “मन की बात” मध्ये कौतुक केले होते।
लोकांनी आपल्या मुलींबरोबरची “सेल्‍फी” सर्वांसमोर मांडावी, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आणि लवकरच हया आवाहनाला जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला।
भारतातील आणि जगभरातील लोकांनी, त्यांच्या मुलीसोबतच्या “सेल्फी” सर्वांसमोर मांडल्या आणि मुली असणाऱ्‍यांसाठी हा एक अभिमानाचा क्षण ठरला।
“बेटी बचाओ, बेटी पढाओ” मोहीम
“बेटी बचाओ, बेटी पढाओ” मोहीम सुरु झाल्यानंतर, जवळजवळ सर्व राज्यांमध्ये बहु विभागीय जिल्हा कृती योजनेचा प्रारंभ झाला।
जिल्हा स्तरावरील अधिकारी आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांची क्षमता वाढवण्यासाठी प्रशिक्षकांना क्षमता निर्मिती कार्यक्रम आणि प्रशिक्षण देण्यात आले।
एप्रिल-ऑक्टोबर 2015 पासून महिला आणि बाल विकास मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात असे 9 प्रशिक्षण संच आयोजित केले आहेत।
“बेटी बचाओ, बेटी पढाओ” योजनेअंतर्गत पिथोरागड जिल्हयाने मुलींच्या संरक्षणासाठी आणि तिला शिक्षण मिळावे यासाठी अनेक पाऊले उचलली आहेत।
या साठी जिल्हा आणि तालुका पातळीवर कृती दल तयार करण्यात आली आहेत,
तसेच CSR संदर्भात बैठक घेऊन कृती योजना तयार करण्यात आली आहे।
मोठया समुदायाला या योजनेची अधिकाधिक माहिती मिळाली म्हणून जागृती निर्मिती कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत।
विविध शाळा, सैनिकी शाळा, सरकारी विभागातील कर्मचारी यांचा समावेश असणाऱ्‍या अनेक रॅली काढण्यात आल्या आहेत।
या उपक्रमाविषयी जागरुकता वाढावी, यासाठी पिथोरागड मध्ये पथ नाटयांचही आयोजन करण्यात येते।
दर्शकांमध्ये मोठया प्रमाणावर जागरुकता निर्माण व्हावी म्हणून केवळ गावांमध्येच नाही तर बाजाराच्या ठिकाणी ही पथनाटये आयोजित करण्यात येतात।
कथांमधून गोष्टी समोर आल्याने स्त्री भृण हत्येबाबतच्या प्रश्नाबाबत लोक अधिक संवेदनशील होत आहेत।
मुली आणि तिला आयुष्यात सामोऱ्‍या जाव्या लागणाऱ्‍या समस्यायांचे प्रत्ययकारी दर्शन या पथनाटयातून घडते।
सहयांची मोहीम, शपथ घेण्याचा समारंभ याद्वारे 700 महाविद्यालयीन विद्यार्थी आणि अनेक लष्करी कर्मचा-यांपर्यंत हा उपक्रम पोहोचला आहे।
“उडान-सपनिया दी दुनिया दी रुबरु”
पंजाबमधल्या मनसा जिल्हयात मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी एक उपक्रम हाती घेण्यात आला आहे।
“उडान-सपनिया दी दुनिया दी रुबरु” या योजने अंतर्गत, मनसा प्रशासनाने सहावी ते बारावी वर्गातील मुलींकडून प्रस्ताव मागवले आहेत।
या अंतर्गत डॉक्टर, पोलीस अधिकारी, अभियंता, भारतीय प्रशासन सवेवेतील अधिकारी बनण्याची
महत्वाकांक्षा असलेल्या मुलींना या क्षेत्रातील व्यायसायिकांबरोबर एक दिवस घालवण्याची संधी मिळणार आहे।
या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला आणि 70 हून अधिक विद्यार्थिनींना अश्या व्यावसायिकां बरोबर एक दिवस
घालवून ते कसे कार्य करतात ते पाहण्याची संधी मिळाली आणि भावी व्यवसाय निवडीबाबत निर्णय घेण्यात हया संधीची मदत झाली।
धन्यवाद!
योग साठी पुढाकार, समाज विकास साठी मन की बात,
समाज विकास साठी सेवा व समर्पण स्वच्छ भारत अभियान!

Editor - Samaj Vikas Samvad
Editor - Samaj Vikas Samvadhttps://www.samajvikassamvad.com
A very early user of the Digital media & social media platform. Founder of NetizenJournalist.com in 2012. Having Scripted many Insightful articles.successfully handling the media relation for the ruling Bharatiya Janata Party, Maharashtra, and RMP-KEC for close to a decade.The socio-Political analysis is the USP of the author...

1 COMMENT

Leave a Reply

Related articles

पीएम मोदी ने लॉन्च की अमृत भारत स्टेशन योजना।

पीएम मोदी ने लॉन्च की अमृत भारत स्टेशन योजना

क्या सच में बीयर नॉनवेज होती है? क्या आपके ड्रिंक में शामिल होती है मछली

क्या सच में बीयर नॉनवेज होती है? क्या आपके ड्रिंक में शामिल होती है मछली?

Hindenburg Report May Discipline Adani Group & Prosper It Further.

Hindenburg report may discipline Adani Group and prosper It further.In 2006, A renowned economic affairs expert and a very potent journalist Mr. Swaminathan S. A. Ayer researched and wrote a paper for the Cato Institute on Gujarat's new strategy of port-based development .This strategy was launched by Congress chief minister Chimanbhai Patel in the early 1990s and expanded by BJP's successors.

Jadui Pitara- A Play-Based Learning-Teaching Material Tailored For Children Aged 3-8 Years Launched.

Jadui Pitara - A play-based learning-teaching material tailored for children Aged 3-8 Years Launched By union education minister Shri Dharmendra Pradhan.Learning - Teaching Material for Foundational Stage Jadui-Pitara has been envisaged under National Education Policy 2020 (NEP2020).Jadui Pitara developed under the National Curriculum Framework is available in 13 Indian languages and